Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक करोना लसीकरणापासून वंचित

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक करोना लसीकरणापासून वंचित

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

करोना संकट काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून सेवा बजावणार्‍या शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक हे केंद्र सरकारने सुरू केलेल्या

- Advertisement -

मोफत करोना लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी शेवगाव तहसिलदार अर्चना पागिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

16 जानेवारी 2021 पासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून करोना संकट काळात सेवा बजावणार्‍या कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर यांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शासकिय लसीकरण मोहिम मोफत स्वरूपात सुरू झाली. करोना काळात मागील सन 2020 व सन 2021 मध्ये तालुका व जिल्हा सीमेवर, रेशन दुकानावर, विलगीकरण कक्षात, करोना सेंटर आयुर्वेद कॉलेज, शेवगाव, करोना सेंटर, त्रिमुर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून सेवा बजावली. परंतु, करोना फ्रंटलाईन वर्कर लसीकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी करोना संकट काळात सेवा बजावली नाही, असे लोक करोना लसीकरणाचे दुर्दैवाने लाभार्थी झाले आहेत.

करोना संकट काळात सेवा बजावणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मोफत लसीकरणाचा लाभ मिळावा. आरोग्य किंवा तहसील विभागाने लिंक भरण्यासासाठी वेबसाईट माहिती दिली नव्हती. ती लिंक त्वरीत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेनदनावर शिक्षक नेते प्रकाश लबडे, राजू ढोले, गुरूकूलचे नेते बापूराव आर्ले, राजन पाटील ढोले, शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, रावसाहेब बोडखे, अस्मान सुपेकर, भारतीचे तालुकाध्यक्ष संदीप कातकडे, विठ्ठल मार्कंडे, गणपत दसपुते, बाळासाहेब वाघुंबरे, विष्णू वाघमारे, रेश्मा धस, मनिषा हरेल, सुंदर सोळंके, संजय भालेकर, स्वराज्य मंडळाचे तालुकाध्यक्ष अरूण पठाडे, मच्छिंद्र भापकर, श्री. पालवे यांच्यासह प्राथमिक शिक्षकांच्या सह्या आहेत.

तातडीने निर्णय घेणार – तहसीलदार

करोना योद्धांसाठीच्या लसीकरण मोहिमेतील लसीकरणाच्या चौकशीचे आदेश तहसिलदार अर्चना पागिरे यांनी दिले आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना लसीकरणाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले, अशी माहिती शिक्षक नेते प्रकाश लबडे व राजू ढोले यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या