देशदूत डिजिटल इम्पॅक्ट : शिरसगाव प्रकरणाची सीईओकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांना फरशीवर अंथरून टाकून झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी लीन बनसोड यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत…

हेही वाचा :

कुटुंब नियोजनाच्या नावाखाली महिलांना धरले वेठीस

देशदूत डिजिटलने आज सकाळी पहिल्यांदा हे वृत्त वेबसाईटवर प्रकाशित केले होते. यानंतर समाज माध्यमांत याप्रकरणी रोष व्यक्त केला जात होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.

करोनामुळे जिल्हयात कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून एप्रिल ते मार्चपर्यत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते.

त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येदेखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ४१ महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती.

मार्च पर्यंत टार्गेट पूर्ण करण्यासाठीच रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप केला जात होता. बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसेच आज सायंकाळपर्यत चौकशी करुन सबंधितांवर नियमानूसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रावर दाखल करण्याच्या सुचना गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्या

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *