राज्याभिषेक सोहळ्यात रायगडावर जमणार लाख मराठा

jalgaon-digital
1 Min Read

सातपूर |Satpur
मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल पण तोपर्यंत छञपती खा. संभाजीराजे भोसले यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय व्हावा तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारला दिलेल्या तिन्ही पर्यायावर सकारात्मक पाऊल उचलावे असे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीने केलेे आहेे.

राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिल्ह्यातील हजारो समाज बांधव मिळेल त्या साधनाने रायगडावर कुच करणार असल्याचाही निर्धार या बैठकीत करण्यात आला.

राज्यव्यापी दौरा आणि विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीनंतर छ. खा. संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आक्रमक पवित्रा जाहीर केला. कोव्हीड महामारीला न जुमानता तिव्र आंदोलनाची घोषणा रायगडावरून केली जाईल, असा इशारा छ.खा. संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने झुम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शंभरहून अधिक समाजबांधव सहभागी झालेल्या या बैठकीत , जिल्हाभरातून हजारो समाज बांधव रायगडावर नेण्याचा निर्धार केला.

याबैठकीत प्रा.उमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी करण गायकर, शिवाजी सहाणे, गणेश कदम, तुषार ताप, राजू देसले, उमेश शिंदे, संतोष माळोदे, निलेश मोरे, योगेश कापसे, राम खुर्दळ, संजय फडोळ, संदीप शितोळे, विजय खर्जुल, आशिष हिरे, सुनील भोर, बंटी भागवत, योगेश पाटील, सुनिल गुंजाळ, यांच्यासह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *