Thursday, May 9, 2024
Homeनाशिकदेवळा : किशोर सागर धरणावर गेलेला युवक बुडाला

देवळा : किशोर सागर धरणावर गेलेला युवक बुडाला

वाजगाव | Wajgoan

किशोर सागर ता.देवळा (रामेश्वर धरण) येथे अंघोळीसाठी गेलेला युवक पाण्यात बुडाला असून शोध कार्य सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

- Advertisement -

देवळा तालुक्यातील सटवाईवाडी ता.देवळा येथील तीन युवक अंघोळी करण्याच्या उद्देशाने किशोर सागर (रामेश्वर धरण) येथे बोटिंग क्लबसाठी बांधण्यात आलेल्या रॅम्प वर गेले.

अंघोळीपूर्वी मोठ्या आनंदात सेल्फी काढले, नंतर अंघोळीचा आनंद घेत असताना आज रविवार (दि.०४)रोजी दुपारी दीड च्या आस पास तीनही युवकानीं पुलावरून पाण्यात उड्या घेतल्या.

यादरम्यान तीन पैकी केशव (राजेंद्र) आहिरे (वय-26) हा एक युवक वरती आला नाही. वर आलेल्या दोन्ही मित्रांनी पाण्यात बुडालेल्या आपल्या मित्राचा शोध घेतला पण आढळून आला नाही.

आपल्या मित्राचा शोध न लागल्याने सोबतचे मित्र घाबरले. सदर घटनेची माहिती मित्रांनी आपल्या अन्य गावातील मित्रांसह देवळा पोलीस स्टेशनमध्ये दिली.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उप. निरीक्षक मातोंडकर यांनी आपल्या पथकासोबत शोध कार्य सुरू केले. धरण परिसर पूर्ण पाण्याने भरले असल्याने शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

देवळा तालुक्यातील दहिवड येथील घटनेला महिना झाला. महिन्याभरातच दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या