Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकच्या युवा कलाकारांचा मलेशियात होणार कार्यक्रम

नाशिकच्या युवा कलाकारांचा मलेशियात होणार कार्यक्रम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक (nashik) मधील पवार तबला अकॅडमी, कलानंद कथक नृत्य संस्था, आदिताल तबला अकॅडमी व के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् (K. K. Wagh College of Performing Arts) चे विद्यार्थ्यानी (students) मलेशिया (Malaysia) येथे 1 ते 7 नोव्हेंंबर दरम्यान क्वालालंपूर (Kuala Lumpur), ब्रिकफिल्ड (Brickfield), मल्लका, कलांग येथे हे सांगीतिक कार्यक्रमामध्ये (Musical program) आपली कला सादर केली.

- Advertisement -

आनंदी अथणी, केतकी चौधरी, श्रावणी मुंगी, ऋतुजा चंदात्रे, तनिष्क तांबट, हिमांशू बर्वे, मंदार पवार, अदिती निलखे, अंकीता शिरसाठ, वैष्णवी जगताप, ऐश्वर्या गोखले, ध्रुव बालाजीवाले, आर्य देशपांडे या विद्यार्थ्यांनी तबला, गायन (singing) आणि कथक नृत्य (Kathak dance) यामधून आपली कला सादर केली, विविध भजने, ताल प्रस्तुती या द्वारे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला

सुर संगीत म्युझिक सेंटर (Sur Sangeet Music Center) तर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मलेशियातील (Malaysia) अरविंदर सिंग रैना यांचे विशेष सहकार्य व नाशिकचे (nashik) प्रसिद्ध कलाकार नितीन पवार (nitin pawar), नितीन वारे (nitin ware), सुमुखी अथणी (Sumukhi Athani), अविराज तायडे (Aviraj Taide) यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या