राज्यातल्या युवा आमदारांना परदेशातल्या ‘या’ विद्यापीठाकडून निमंत्रण

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्यातल्या नेत्यांंना परदेश दौरे म्हणजे काही नवल नसतात. मात्र त्यातच परदेशातल्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाकडून जर बोलावणे आले तर ते नक्कीच अभिमानास्पद असेल. वेल्स सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून निमंत्रण मिळण्याची बाब जरा सन्मानाचीच म्हणावी. देशातील एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राच्या सौजन्याने हा दौरा १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठाने सुशासन व सार्वजनिक धोरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.विविध जागतिक आव्हानाना सामोरे जाण्यासाठी मूल्याधिष्ठित व शाश्वत नेतृत्व विकसित करण्याचे ध्येय ठेवून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

या कार्यशाळेसाठी राज्यातल्या आमदारांना आमंत्रित करण्यात आले असून, यात भाजपचे आमदार डॉ.पंकज भोयर वर्धा, मिहिर कोटेचा मुलुंड, सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर, जयकुमार रावल सिंदखेड, मेघना साकोरे जिंतूर.

तसेच, अमित साटम अंधेरी वेस्ट, काँग्रेसचे अमीन पटेल मुंबादेवी,विश्वजित कदम पलूस कडेगाव, झिषान सिद्दीकी बांद्रा, सत्यजित तांबे अपक्ष, सेनेचे योगेश कदम दापोली, समाजवादी पक्षाचे रईस शेख भिवंडी, बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर नाला सोपारा यांचा या दौऱ्यात समावेश आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *