Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedयुवा पिढीची गुन्हेगारीकडे वाटचाल?

युवा पिढीची गुन्हेगारीकडे वाटचाल?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

गेेल्या आठवड्यात नाशिक शहरात (nashik city) तब्बल चार खुनांच्या घटना घडल्या. या सर्व घटनांमध्ये परस्पर काही संबंध नसला तरी त्यामध्ये एक साम्य दिसून येत आहे. यातील पंचवटीतील (panchavati) एक घटना वगळता अन्य तीनही खुनांमध्ये 30 वर्षांच्या आतील तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आल्याने आजच्या तरुण पिढीत (younger generation) संयमशीलता कशी लोप पावत चालली आहे, हे चित्र उघड झाले आहे.

- Advertisement -

गेल्या बर्‍याच महिन्यांपासून नाशिकमधील गुन्हेगारीचा (Crime) आलेख बघता अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये सहभागासह तिशीच्या आतील तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. शहरात घडणार्‍या सोनसाखळी चोरी (Gold chain theft), घरफोडी (Burglary), खून (murder), हाणामारीच्या घटना बघता यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. लवकर श्रीमंत होण्याच्या दृष्टीने किंवा स्वतःचे गुंडगिरीमधील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सुरु असलेली चढाओढ याकरिता करण्यात येणार्‍या हाणामार्‍यांमध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

सध्या गुंडगिरीवर (Bullying) आधारित चित्रपट किंवा वेबसिरीज (Webseries) बघून तरुण पिढी त्याकडे आकर्षित होऊन गुन्हेगारी जगतात प्रवेश करतांना दिसते. मात्र, तो चित्रपट किंवा वेबसिरीजचा शेवट म्हणजे गुन्हेगारीचा किंवा गुन्हेगाराचा दुर्दैवी अंत होतो, याकडे या तरुणाईने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सलग दोन दिवसांतील चार खुनांच्या घटनेने नाशिक शहर हादरले होते. या घटनांमुळे पोलीस प्रशासनावर (Police administration) ताशेरे ओढले जाऊ लागले होते. मात्र, जेव्हा या खुनांचा उलगडा झाला तेंव्हा सत्य काही वेगळेच समोर आले. चारही घटना ह्या वेगवेगळ्या व क्षुल्लक कारणावरून घडलेल्या होत्या.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीत किरण ऊर्फ यश रामचंद्र गांगुर्डे (24) या तरुणाचा क्षुल्लक कारणावरून खून करण्यात आला. यातील एक संशयित हा अंदाजे 28 वर्षांचा होता तर इतर संशयित हे 25 वर्षांच्या आतील होते. यानंतर दुसर्‍या घटनेत पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीत जगदीश पुंडलिक जाधव (48) यांनी त्यांचा मुलगा प्रणव जगदीश जाधव (17) याच्या हट्टी स्वभावातून उलटून बोलणे, हात उगारणे, शिवीगाळ करणे याला कंटाळून झोपेत त्याचा गळा आवळून खून केला व स्वतः गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेत एका वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाचा खून करण्यापर्यंत वेळ यावी म्हणजे मुलाने कुठल्या प्रकारे घरच्यांना त्रास दिला असेल हे लक्षात येते.

तिसर्‍या घटनेत गोदावरी नदी (godavari river) पात्राजवळ आनंदवल्ली येथे झालेल्या प्रथमेश रतन खैर (23) या तरुणाचा खून करणारे संशयित हे त्याचेच मित्र असून त्यांचे वय हे 25 वर्षांच्या आत असून त्यातील दोन जण कायद्याचा अभ्यास करत आहेत. चौथ्या घटनेत पुण्याहून नाशिकला आलेले हरीश पाटील (49) यांना अवघ्या 19 वर्षाच्या मुलासह अन्य दोघांनी काहीही ओळख नसतांना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जिवे ठार मारले. सध्या घडणार्‍या या घटनांमध्ये तरुण पिढी किती आक्रमक होत चालली आहे, हे दिसून येते.

मुलांचा घरच्यांशी संपर्क तुटला म्हणून की घरच्यांसोबत संवादाची कमतरता यामुळे आजची तरुण पिढी आक्रमक रूप धारण करत गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहे, हे कोडेच आहे. सोशल मीडियामुळे घरच्यांशी व मित्रांशी समोरासमोर होणारे संवाद तरुण पिढीचा तुटत आहे. याकडे पालकांनी देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सध्या तरुण पिढीमध्ये वाढत असलेले व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील जास्त असल्याने समाजातील घटकांनी तरुण पिढीसाठी पुढाकार घेणे देखील गरजेचे झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या