Wednesday, April 24, 2024
Homeजळगावगोद्री कुंभासाठी योगी आदित्यनाथ, शिंदे, फडणवीस आज जामनेरमध्ये येणार

गोद्री कुंभासाठी योगी आदित्यनाथ, शिंदे, फडणवीस आज जामनेरमध्ये येणार

जामनेर jamner ।

अ.भा. हिंदू गोरबंजार लभाना नायकडा समाजाचा(A.B. Hindu Gorbanjar Labhana Naikada) कुंभ 25 जानेवारी पासून गोद्री ता.जामनेर येथे सुरु असून दररोज कुंभात सहभागी होणार्‍या नागरिकांची संख्या प्रचंड वाढत आहे. दरम्यान गोद्री कुंभासाठी सोमवारी 30 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath,), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde,), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जगदगुरु शंकराचार्य द्वारकापिठाधीश्वर (Jagadguru Shankaracharya Dwarkapithadhishwar) आणि योगगुरु रामदेव बाबा (Yoga guru Ramdev Baba) हे उपस्थिती देणार आहे.

- Advertisement -

दि.24 रोजी कुंभस्थळापासून धर्मस्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती. यात 30 हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरद्वारे शोभायात्रेत पुष्पवृष्टी करण्यात आली. दि.25 पासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. दि.28 रोजी मध्य प्रदेशमधून 800 वाहनांमधून 35 हजार भाविक रात्री दाखल झाले.

रात्री 1 वाजता यांची भोजन व्यवस्था उत्तमरित्या झाली. कर्नाटक, तेलंगणा येथूनही हजारोंच्या वाहने संख्येने लाखो भाविक कुंभस्थळी दाखल झाले आहेत. तसेच पंजाब, हरियाणा, संयुक्त राष्ट्र अमेरिका येथूनही भाविक दाखल झाले आहेत.

चार दिवसांपासून भाविकांच्या संख्येत 30 ते 40 हजाराने वाढ होत आहे. गोद्रीसह आसपासच्या परिसराला मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरुप आले असून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

आज 30 रोजी सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक भाविक कुंभस्थळी येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दि.25 जानेवारीला रात्री अवकाळी पाऊस होऊनही दि.26 ला बहुसंख्येने भाविक कुंभस्थळी आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या