भाजीपाला व्यवसाय सांभाळत दिले योगाचे धडे; इंटरनॅशनल ‘बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

jalgaon-digital
1 Min Read

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

येथील योग अभ्यासक (Yoga Teaher ) मुकेश खरे (mukesh khare) यांनी राज कपोतासन या योगाचे सुमारे पंधरा मिनिटे आसन सादर केले. या योगानंतर त्यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली….

याआधी सुमारे दहा मिनिटांचे आसनाचीही नोंद त्याच्याच नावावर आहे. खरे यांची अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण केले. पिंपळगाव बसवंत (Pimpalaon Baswant) येथील भाऊ नगर (Bhau Nagar) या झोपडपट्टीत राहत असताना त्यांनी एमए (MA) पर्यंतचे शिक्षण घेतले.

यासोबतच त्यांनी नाशिकमधील येथील आदियोग महाविद्यालयात योगावर शिक्षण घेतले. लाॅकडाऊन काळात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेक करोना सेंटरला (Covid Center) त्यांनी योगाचे धडे शिकवले.

ते सध्या बालसंस्कार योग प्रशिक्षण वर्गातून नविन पिढीला ते योगाचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे ते अजूनही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सांभाळून योगाचे धडे ते देत आहेत.

सध्याच्या युगात निरोगी जीवन जगण्यासाठी व स्वतःचे दर्शन देणारे शास्त्र म्हणजेच योग शास्त्र असल्याचे मत खरे यांनी व्यक्त केले. या यशामागे आई वडीलांनी मजुरी करत झोपडपट्टीत राहुन शिक्षण दिले. निर्व्यसनी बनवले व सर्व मित्र परिवाराने सहकार्य केल्यानेच हे यश संपादन केले असल्याचे मुकेश खरे (Mukesh Khare) यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *