Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 : पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह 10 संघ भारतात

World Cup 2023 : पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह 10 संघ भारतात

नवी दिल्ली| New Delhi

विश्वचषक 2023 (World Cup 2023) सुरू होण्यासाठी अवघ्या आठ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने पार पडणार असून दहा संघ सहभागी होणार आहेत. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 (World Cup 2023) सुरू होत आहे.

- Advertisement -

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील विश्वचषकातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) होणार आहे. 10 संघांच्या या स्पर्धेतील महाअंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 46 दिवस चालणार्‍या क्रिकेटच्या या मेगा स्पर्धेमध्ये एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर आपल्याला एक नवा एकदिवसीय विश्वविजेता संघ मिळणार आहे. तसेच भारत (India), पाकिस्तानसह (Pakistan) सर्व संघाचे शिलेदार निश्चित झाले आहेत. यामध्ये बदल करण्याची आज अखेरची तारीख आहे.

हे आहेत दहा संघ ?

भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड हे दहा संघ यंदाच्या विश्वचषाकात एकमेकांसोबत भिडणार आहेत.

पाकिस्तानचा संघ सात वर्षानंतर भारतात

व्हिसाच्या मुद्द्यावरून बराच वाद झाल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) अखेर त्यांच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) सहभागापूर्वी भारतात आला आहे. ते न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहेत. 2016 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ शेवटच्या वेळी भारतात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या