Thursday, April 25, 2024
Homeधुळेबाल कामगारांना कामावर ठेवाल तर तुरूंगात जाल

बाल कामगारांना कामावर ठेवाल तर तुरूंगात जाल

धुळे । प्रतिनिधी dhule

बालकामगार कायद्याचे पालन होण्यासाठी दुकाने, आस्थापना, कारखाने, सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल व गॅरेज या ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना व 14 ते 18 किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेऊ नये. अशी मुले कामावर ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती सुर्यवंशी यांनी केले आहे.

- Advertisement -

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 अंतर्गत जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून 12 जून हा दिवस साजरा केला जात आहे. 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियामध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्ष पर्यंत वाढविता येईल इतक्या तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रूपये व कमाल 50 हजार रूपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 ते 3 वर्ष पर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बालकास किंवा किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास कामगार कार्यालय, धुळे यांच्या सश्रेवर्हीश्रशूरहेे.लेा या ईमेवर संपर्क साधावा. असे श्रीमती सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या