Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबेरोजगार सेवा सोसायट्यांसाठी काम वाटप समिती

बेरोजगार सेवा सोसायट्यांसाठी काम वाटप समिती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना ( Unemployed Service Societies )तीन लाख रुपयापर्यंत विनानिविदा काम देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय काम वाटप समिती ( Work Allocation Committee )नियुक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

याकरता शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी कामाचे प्रस्ताव विहित प्रपत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात वेळेत सादर करावेत, असे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी ( Assistant Commissioner Anisa Tadvi)यांनी कळवले आहे.

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध प्रकारची तीन लाख रुपयांची कामे नोंदणीकृत कार्यरत सेवा सोसायट्यांना विनानिविदा देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

याकरता जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील होणारी दैनंदिन व्यवहाराची कामे, आवश्यक सेवा, साफसफाई, स्वच्छतेची कामे तसेच विविध कंत्राटदारामार्फत करण्यात येणारी कामे बेरोजगारांच्या सहकारी संस्थामार्फत करून घेण्यासाठीचे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, अशी माहितीही सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली.

सेवा सोसायट्यांना कामे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी किमान वेतन अधिनियम, 1948 अंतर्गत तरतुदीतील दरानुसार कामगार कर्मचार्‍यांना वेतन मिळेल अशा पद्धतीने कामाचे प्रस्ताव विहित प्रपत्रात सादर करावे, असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या