Friday, April 26, 2024
Homeजळगावफुलगाव ग्रामपंचायतीवर महिलांचा आक्रोश मोर्चा

फुलगाव ग्रामपंचायतीवर महिलांचा आक्रोश मोर्चा

वरणगाव फॅक्टरी, Varangaon factory । वार्ताहर

फुलगावसह (Fulgaon) चार गावांचा (four villages) पाणीपुरवठा (Water supply) करण्यासाठी असलेल्या पंपाचा वीज पुरवठा खंडित (Power outage) केला आहे. गेल्या आठ दिवसापासून फुलगावला पिण्याचे पाणी न मिळाल्याने गुरुवारी संध्याकाळी सातशे ते आठशे महिला व पुरुषांनी ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) मोर्चा (Aakrosh Morcha)काढला. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी उपस्थिती न दिल्याने मोर्चाने सरळ सरपंच यांचे घरी मोर्चा नेला.

- Advertisement -

नेहमीच गावकर्‍यांना वीज मंडळाकडून धारेवर धरले जाते, त्यानंतर आमदार अथवा पालकमंत्र्यांनी फोन केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जातो. आतापर्यंत या गावांचा दहा ते बारा वेळा पाणीपुरवठा विजेअभावी खंडित करण्यात आला आहे. परंतु यावर अद्यापपर्यंत कोणताही पर्याय काढण्यात आलेला नाही.

गेल्या आठ दिवसापासून फुलगावला पिण्याचे पाणी न मिळाल्याने गुरुवारी संध्याकाळी सातशे ते आठशे महिला व पुरुषांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी उपस्थिती न दिल्याने मोर्चाने सरळ सरपंच यांचे घरी मोर्चा नेला. त्यावेळी सरपंच त्यांच्या घरातील सदस्य व मोर्चेकरी महिलांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. महिलांचे एकच म्हणणे होते की, आम्हाला पाणी केव्हा मिळणार घरपट्टी भरून सुद्धा आठ दिवस पाणी न मिळाल्याने महिलावर्ग संतप्त झाल्याचे दिसत होते.

आठ दिवसापासुन सुद्धा या चार गावांचा वीज पुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. फुलगाव, वरणगाव, दोन्ही कठोरा, अंजनसोंडे या पाच गावांचा एकत्रित पाणीपुरवठा असताना लाखो रुपयाचे थकीत विजबिल या पाणीपुरवठ्याचे होते, त्यानंतर वरणगावने आपला स्वतंत्र पुरवठा करून घेतला व थकीत पूर्ण रक्कम या चार गावावर लादली गेल्यानेच या चार गावांवर वेळोवेळी ही वेळ असल्याचे गावकर्‍यांकडून बोलले जाते.

मंत्री, आमदार, खासदार यांनी फक्त पुरवठा चालू करण्या व्यतिरिक्त याबाबत कोणताही तोडगा यावर काढलेला नाही त्यामुळे वेळोवेळी या गावांना पाणीटंचाई केवळ विद्युत मंडळाच्या बेजबाबदारपणामुळे पाणी पुरवठ्याच्या यातना भोगाव्या लागतात, वास्तविक पाहता या चार गावांना दीपनगर प्रकल्पाचा सर्वाधिक प्रदूषणाचा फटका विद्युत मंडळाकडून असूनही विद्युत मंडळ वारंवार यांचा वीज पुरवठा खंडित करीत आहे, यामुळे चारही गावांच्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तरी लोकप्रतिनिधींनी याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी गावकर्‍यांमध्ये होत आहे.

सरपंच वैशाली टाकोळे यांनी काही बिलाच्या रकमेचा ड्राफट भरल्याचे सांगितले, परंतु प्रोसेस दोन दिवस पाणी मिळणार नाही, तसेच टँकरने पाणी पुरवणे शक्य नसल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या