आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे कार्य कौतुकास्पद – अदिती तटकरे

jalgaon-digital
2 Min Read

घोटी | प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या अडचणी सोडवण्यावर महिला बाल विकास विभागाचा (Department of Women and Child Development) पुढाकार राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समिती निधीतून (District Planning Committee Fund) अंगणवाडी इमारती करीता निधीची तरतूद करण्याची गरज आसल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

पुढील वर्षी राज्यात डॉ. आनंदीबाई जोशी शिबिरा अंतर्गत सेविका व मदतनीस कुटुंबाला देखील आरोग्य योजनेत समाहून घेतले जाईल. लॉकडाऊन काळात आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी केले.

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालाय,पोषण अभियांनांतर्गत शुक्रवारी ( ता. १ ) ११ वाजता घोटी येथील मातोश्री लॉन्स सभागृहात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पोषण महिला राज्यस्तरीय उदघाटन दरम्यान मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य आदिती तटकरे ह्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर डॉ. अनुपकुमार यादव सचिव, महिला व बाल किकास विभाग, रुबल अग्रवाल, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार हिरामण खोसकर,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे,तहसीलदार अभिजित बारवकर, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड,जिल्हा कार्यध्यक्ष गोरख बोडके, घोटी सरपंच गणेश गोडे, हरीश चव्हाण आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या दिंडीने व आदिवासी युवकांच्या कामड नाचणे स्वागत, पोषण आहार अभियांनांतर्गत पुरस्कृत पुरस्कार प्रतिनिधिक स्वरूपात महिलांचा तीन लाखांचा धनादेश देत गौरव, माझी कन्या भाग्यश्री, बेबी किट, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पुरस्काराने सन्मान, महिला बचत गटांना तीन लाखांचे कर्ज वाटप धनादेश देण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *