Thursday, April 25, 2024
Homeनगरमहिलेसोबत गैरवर्तन करत केली मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा

महिलेसोबत गैरवर्तन करत केली मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी कोठला भागात ही घटना घडली.

- Advertisement -

सफिया राजू शेख, नसरीन शेख, मुजम्मील शेख, राजु (पूर्ण नावे माहिती नाही) व एक अनोळखी महिला (सर्व रा. मुकुंदनगर) विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी फिर्यादी, त्यांची आई व बहिण असे त्यांच्या घरासमोर उभे असताना तेथे सफिया, नसरीन, मुजम्मील, राजु व एक अनोळखी महिला तेथे आले.

आमच्या मुलीला का मारहाण केली, असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुज्जमील शेख याने फिर्यादीचा हात पकडून त्यांना जवळ ओढून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या