Friday, April 26, 2024
Homeजळगावलग्नाच्या रात्री बळजबरी हुक्का पाजून महिलेचा छळ

लग्नाच्या रात्री बळजबरी हुक्का पाजून महिलेचा छळ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

नाशिक येथील सासर असलेले आणि जळगावची माहेरवाशिण असलेल्या विवाहितेला लग्नाच्या रात्री बळजबरी हुक्का आणि बियर पाजण्यास पतीने प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

- Advertisement -

तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे की, लग्न जुळल्यापासून सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे.

पारावर मानाचे ताटच्या ऐवजी 10 हजाराची मागणी करण्यात आली. तसेच लग्नात मेकअपसाठी लागलेले 25 हजार रुपये देखील माहेरून आणण्यासाठी छळ केला.

लग्ना झाल्यानंतर हनिमूनसाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गेल्यावर पतीने बिअर पिण्यासाठी जबरदस्ती केली. एवढेच नव्हे तर बळजबरीने हुक्का पिण्यास भाग पाडले.

यासंदर्भात पती भूषण दिनकर मोरे (वय 34), सासू कमल दिनकर मोरे, सासरा दिनकर भास्कर मोरे आणि नणंद वृषाली जयेश कोरे सर्व रा. सिद्धार्थ नगर, लोंढे गेस्ट हाऊस मागे, नाशिक यांचेविरुद्ध भादंवि कलम 498, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या