अ‍ॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रीयेनंतर महिलेचा मृत्यू

jalgaon-digital
3 Min Read

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील देवपूर भागातील तिरूपती नगरातील 28 वर्षीय महिलेवर (woman) साक्री रोडवरील एका रूग्णालयात अ‍ॅपेंडिक्सची (appendix) शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा प्रकृती बिघडल्याने (Impaired health) महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे या महिलेचा मृत्यू (Death) झाला. त्यानंतर नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. डॉक्टरांच्या (doctor) हलगर्जीपणामुळेच (negligence) महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, भुमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी संतप्त नातलगांची समजूत काढली. कायद्यानुसार जे शक्य असेल ते करण्याचे आश्वासन दिले.

नगावबारी परिसरातील बिलाडी रोडवर तिरूपती नगरात बांधकाम ठेकेदार गुलाब कोळपे (Construction contractor Gulab Kolpe) हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. कोळपे यांच्या पत्नी सुनिता हिला त्रास होत असल्याने दि.9 एप्रिल रोजी साक्री रोडवरील चंद्रमा अ‍ॅपेक्स हॉस्पिटल (Chandrama apeksha hospiṭal) येथे दाखल करण्यात आले.

डॉ.स्वप्नील शहा (Dr. Swapnil Shah) यांनी सुनिताला अ‍ॅपेंडिक्स (appendix) असल्याचे सांगत तिच्यावर शस्त्रक्रियाही केली. त्यानंतर दि.13 एप्रिल रोजी सुनिताबाई कोळपे यांना घरी सोडण्यात आले. घरात जावून चोविस तास होत नाही तोच सुनिता कोळपे यांना पुन्हा त्रास होवू लागला. रात्री दहाच्या सुमारास तिला उलटी झाल्याने नातलगांनी तत्काह चंद्रमा हॉस्पिटल येथे दाखल केले.

यावेळी डॉ.स्वप्नील शहा यांनी सुनिताबाईला हृदयविकाराचा त्रास (heart disease

Trouble) होत असल्याचे सांगत उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र आज पहाटे पाचच्या सुमारास सुनिताबाईचे निधन झाले. ही माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. तर डॉक्टरांना कळाल्याने ते देखील तेथे दाखल झाले. सुनिताबाईला तत्काळ उपचारासाठी हलवावे लागेल, असे म्हणत डॉ.स्वप्नील शहा यांनी रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र रूग्णवाहिका येण्यास उशिर होत असल्याने अखेर डॉ.शहा यांनी स्वतःच्या कारमध्ये सुनिताबाईला साक्रीरोडवरील सेवा हॉस्पिटल येथे नेले.

तेथे डॉक्टरांनी तपासून सदर महिलेस सिव्हील हॉस्पिटलला (Civil Hospital) घेवून जाण्यास सांगितले. दरम्यान, सदरची घटना मयत महिलेच्या अन्य नातेवाईकांना कळाल्याने त्यांनीही साक्री रोडवरील चंद्रमा हॉस्पिटल येथे धाव घेतली. काही संतप्त नागरिकांनी तर डॉक्टरांवरच रोष व्यक्त केल्याने तणाव निर्माण झाला.

याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे पोलीस पथकासह दाखल झाले. यावेळी धनगर समाजाचे आण्णा खेमनर, युवराज हटकर, प्रकाश खरात आदींनी पोलिसांशी चर्चा केली. संतप्त नातलगांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नातलगांच्या म्हणण्यानुसार, सुनिताबाईचा मृत्यू चंद्रमा हॉस्पिटलमध्येच झालेला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ((negligence)) तिचा जीव गेला. उगाच मदतीचा आव आणून डॉक्टर त्यांच्यावरील जबाबदारी झटकू पहात आहेत. त्यांनी केलेल्या अ‍ॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेमुळे ही घटना घडली असून या महिलेचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे.

डॉ.शहा यांच्यावर गुन्हा(crime) दाखल करावा तोपर्यंत मृतदेह (Corpses) ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका नातेवाईकांनी घेतल्याने निरीक्षक देशमुख यांनी त्यांना कायद्यानुसार तपास व कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार शहर पोलिसात मृत महिलेच्या नातेवाईकांची फिर्याद नोंदवून घेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच तपास करून आणि वैद्यकीय उपचाराचा अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *