Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याइच्छुक सतर्क; मे मध्ये निवडणूक?

इच्छुक सतर्क; मे मध्ये निवडणूक?

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) निवडणूक (election) मे महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार (Candidate) सध्या अलर्ट मोडवर आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणबाबत (OBC reservation) काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देण्याचे नाही, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधार्‍यांनी केली आहे, तर याबाबत विधेयक तयार केले आहे. विधेयकावर राज्यपाल (Governor) यांनी स्वाक्षरी केली असून त्याचे राजपत्र 11 मार्च रोजी जारी झाले आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणुकीसंदर्भात नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) कोणत्याही प्रकारचे पत्र पाठवले नाही.

नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून एक फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नाशिक महापालिका प्रशासनाने शहरातील एकूण 44 प्रभागाचे प्रारूप प्रभाग रचना जाहीर (Ward structure announced) करुन त्याच्यावर हरकती मागवल्या होत्या. 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती, त्या दिवसापर्यंत 211 हरकती प्राप्त झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अश्विनकुमार मुदगल यांना हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नाशिकला (nashik) पाठविण्यात आले होते.

23 फेब्रुवारी रोजी सर्व हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम अहवाल सहा मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यानंतर राज्य शासनाने केलेले विधेयक व त्याचे राजपत्र झालेले रूपांतर यामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगने (Election Commission) आत्तापर्यंत निवडणुकीसंदर्भात काहीही पत्र दिले नाही.

दरम्यान निवडणुका पुढे जाण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागतो तर चालू महिन्याच्या शेवटी जरी निवडणूक आयोगाने (Election Commission) तारखा घोषित केल्या तरी मे महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात नाशिक महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

दोन सदस्य प्रभागाची चर्चा

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेत प्रभाग रचना त्रिसदस्यीय करण्यात आली आहे. मात्र ओबीसी आरक्षण बाबत जो विधयक तयार करण्यात आला आहे, त्यानंतर नाशिकसह राज्यातील मुंबई सोडून सर्व महापालिकांचे दोन सदस्य प्रभागरचना होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र दोन सदस्य प्रभाग होण्याची शक्यता अत्यंत कमी असून त्रिसदस्य प्रभाग रचना नुसारच आगामी महापालिका निवडणूक होणार असल्याचे वृत्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या