रविवारच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार!

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

मराठा क्रांती मोर्चा,महाराष्ट्र यांची राज्यस्तरीय बैठक आज मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की…

सर्व जिल्ह्यामध्ये येत्या रविवारी जिल्हास्तरीय बैठका घेऊन मराठा समाजाच्या तळागाळातील घटकांचे मत घेऊन संपूर्ण राज्याची पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी.

राज्य सरकार मधील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी न्यायालयाचा आदेश येण्याआधीच आरक्षण विरोधी निर्णय घेतल्याने मराठा विरोधी मंत्र्यांचा निषेध यावेळी सर्वानुमते करण्यात आला.

राज्य सरकारची व विशेषतः विधी विभाग व महा अधिवक्ता आशुतोष कुंभकोनी हे मराठा आरक्षण ची सुयोग्य बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून दूर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्री व मराठा समस्यां बाबतच्या उपसमितीच्या संयुक्त बैठकीवर बहिष्काराचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असा ठराव सर्व जिल्ह्यांच्या समन्वयकांनी एकमताने घेतल्याचे सांगण्यात आले.

यावेळी महेश राणे, संजय लाखे पाटील, युवराज सूर्यवंशी, गणेश काटकर व इतर समन्वयक उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *