Thursday, April 25, 2024
Homeजळगावखोट्या तक्रारी करणाऱ्यांवर अंकुश आणणार-एम.राजकुमार

खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर अंकुश आणणार-एम.राजकुमार

रावेर|प्रतिनिधी raver

येथील पोलीस स्टेशनमध्ये पो.अधीक्षक एम,राजकुमार यांच्या हस्ते विश्रामगृह व सीसीटीव्ही प्रणालीचे उद्घाटन बुधवारी संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया,परिक्षावधीन आयएएस अर्पित चव्हाण,फैजपूर प्रांतअधिकारी कैलास कडलग,पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे,तहसीलदार बंडू कापसे,पालिकेच्या मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे,माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद,धनंजय चौधरी,परिक्षावधीन तहसीलदार डॉ. मयूर कळसे,निंभोरा सहा. पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ,सावदा सहा. पोलीस निरिक्षक जालिंदर पळे,फैजपूर सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ उपस्थित होते.प्रास्ताविक पो.नि.कैलास नागरे यांनी केले. शिवसेनेचे नेते प्रल्हाद महाजन,दिलीप कांबळे, पद्माकर महाजन, अ.मुत्तल्लिब,यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पोलीस अधीक्षक पुढे बोलतांना म्हणाले कि,सीसीटीव्ही चा वापर गुन्हेगार पकडण्यासाठीच नाहीं तर खोट्या तक्रारी करून कुणाचेही नांव तक्रारीत घेणार्यांना चाप बसणार आहे.निरपराध लोकांवर अन्याय होणार नाही,यासाठी यंत्रणा उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

याप्रसंगी शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष अशोक वाणी, हरिष गणवानी, कन्हैयालाल अग्रवाल,मानस कुळकर्णी, संजय वाणी,राजन लासुरकर,डॉ.राजेन्द्र पाटील,अनिल अग्रवाल,डॉ.सुरेश पाटील, संतोष अग्रवाल,संतोष पाटील, कपिल दुबे, राहुल चौधरी, चंद्रकांत पाटील( केऱ्हाळे), अँड.प्रवीण पासपोहे, सोपान पाटील,संजय अग्रवाल, अरुण शिंदे,अमोल गणेश पाटील, ई.जे.महाजन, दिलिप हिरामण पाटील,शेख मेहमूद, शैलेश अग्रवाल, नितीन पाटील,व पदाधिकारी उपस्थित होते.

सीसीटीव्हीमुळे अमळनेर दगडफेक प्रकरणातील ८४ जणांवर गुन्हा दाखल 

अमळनेर येथे दोन गटात दगड फेक झाल्यावर दोन्ही गट आमच्याकडे येवून एकमेकांबाबत तक्रार नसल्याचे सांगून गुन्हा दाखल करून नये यासाठी प्रयत्न करत होते.मात्र शहरातील सीसीटीव्हीच्या मदतीने दगडफेक करणारे ८४ लोक शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या ८४ लोकांबाबत पुरावे आहेत.सीसीटीव्ही यंत्रणा यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या