Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामोदी-अदानींचे नाते काय? ते २० हजार कोटी कोणाचे?; खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल...

मोदी-अदानींचे नाते काय? ते २० हजार कोटी कोणाचे?; खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी कडाडले

दिल्ली | Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. अशातच, राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

ते २० हजार कोटी कोणाचे?

राहुल गांधी म्हणाले की, भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे. याची रोज नवनवीन उदाहरणे मिळतात. मी फक्त एकच प्रश्न विचारला की अदानीजींच्या शेल कंपन्या आहेत. त्यात २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले. हा अदानीजींचा पैसा नाही. त्यांचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे. पैसा दुसऱ्याचा आहे.’

कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्…

मोदी-अदानींचे नाते काय?

राहुल गांधी म्हणाले की, प्रश्न असा आहे की, हे २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? मी संसदेत पुरावे दिले जे मी मीडिया रिपोर्टमधून काढले आहेत. मी अदानी जी आणि मोदी जी यांच्यातील संबंधांबद्दल बोललो. त्यांचे नाते नवीन नसून जुनेच आहे. नरेंद्र मोदी जी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे नाते आहे. मी विमानाचा फोटो दाखवला. ज्यात नरेंद्र मोदीजी त्यांच्या मित्रासोबत अगदी आरामात बसले होते. हा फोटो मी संसदेत फोटो दाखवला.

३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव
राहुल गांधी नाहीच, तर ‘या’ दिग्गजांनी कोर्टाच्या निकालानंतर गमावली आहे खासदारकी, आमदारकी

मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही, मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही

तसेच, अदानीच्या घोटाळ्याबाबत मी संसदेला पत्र लिहिले, पण काहीही झाले नाही. काही नेत्यांनी सांगितले की, मी विदेशी शक्तींची मदत घेतली, असे काही नाही. मी बरीच पत्रे लिहिली पण उत्तर मिळाले नाही. मला बोलू दिले जात नाही, असे मी लोकसभा अध्यक्षांनाही सांगितले. मी काहीही करू शकत नाही, असे अध्यक्ष म्हणाले. मी भविष्यात मोदीजींना विचारणार आहे की, २० हजार रुपये कोणाचे आहेत. मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. असेही ते म्हणाले.

Earthquake : दिल्ली पाठोपाठ मध्यप्रदेशात भूकंपाचे धक्के, भीतीने लोक घराबाहेर पडले

हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदाणी आणि मोदींच्या संबंधाचा विषय

राहुल गांधी यांनी मोदींना चोर म्हणून ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. या आरोपांनाही राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. मी भारत जोडो यात्रेदरम्यान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चाललो. माझ्या यात्रेत सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदाणी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजपा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्न विचारणं बंद करणार नाही, असेही ते म्हणाले.

माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे

राहुल गांधी यांना तुम्ही माफी मागून हे प्रकरण संपवणार का, हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की, माफी मागायला माझं नवा सावरकर नाही. मी गांधी आहे, गांधी हे कधी माफी मागत नाहीत, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या