Wednesday, April 24, 2024
Homeनगर८० हजाराची लाच घेतांना दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात!

८० हजाराची लाच घेतांना दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात!

राहुरी | प्रतिनिधी

अहमदनगर येथील जातपडताळणी कार्यालयातून जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ८० हजाराची लाच घेताना राहुरी तालुक्यातील सडे येथील दलालांना अहमदनगर लाचलुचपत खात्याने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील सडे येथील हबीब बाबूभाई पठाण व शकील अब्बास पठाण या दलालांनी तिन इसमांचे खोटे जातीचे दाखले काढुन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज केला असलेने त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या करिता दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल तक्रारदार यांचे बाजुने लाऊन देणे करिता आरोपी हबीब बाबूभाई सय्यद याने तक्रारदार यांचें कडे तेथील अधिकारी यांना १ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्याआधारे दिनांक १३ ऑक्टोबर२०२१ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी हबीब बाबूभाई सय्यद याने पंचा समक्ष एक लाख रूपयांची मागणी करून तडजोड अंती ८० हजाराची मागणी करून त्यापैकी अर्धी रक्कम दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्विकारण्याचे मान्य केले.

दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी हॉटेल नितीन, स्टेशन रोड, राहुरी येथे आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी हबीब बाबूभाई सय्यद याने सदरची लाच रक्कम ४० हजार रूपये तक्रारदार यांचे कडुन स्विकारुन सदर रक्कम आरोपी शकील अब्बास पठाण याचेकडे दिली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या