श्रमदानातून बारवेचा जीर्णोद्धार

jalgaon-digital
3 Min Read

म्हाळसाकारे । कृष्णा अष्टेकर | Mhalasakare

म्हाळसाकोरेच्या (Mhalasakare) म्हाळसादेवी मंदिराजवळील पुरातन चिरेबंद असलेल्या बारवेची (well) पडझड होऊन ती नामशेष होऊ लागल्याने गुढीपाडव्याच्या (gudipadva) मुहुर्तावर गावातील तरुण एकत्र येत श्रमदानातून या बारवेची स्वच्छता मोहीम (Sanitation campaign) हाती घेतली आहे. येथील पुरातन व ऐतिहासिक (Ancient and historical) असलेल्या या बारवेचे जतन व्हावे यासाठी गावातील तरुण पुढे सरसावले आहे.

अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या काळात ज्या बारवा होत्या त्या आता काळाच्या ओघात नामशेष होत आहे. म्हाळसाकोरे गावातील होळकर कालिन ही ऐतिहासिक बारव (Historical well) म्हणजे म्हाळसादेवीची स्नानाची जागा म्हणून धार्मिकतेचे वलय असलेली तसेच चिरेबंदी बांधकामाची आणि पाण्यापर्यत उतरण्यासाठी पायर्‍या असणारी तसेच गावचे वैभव म्हणून या बारवेची ख्याती होती.

परंतु आता या बारवेची पडझड झाल्याने एक ऐतिहासिक ठेवा नामशेष होत आहे. राज्याच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत (Tourism development plan) बाजार मैदानाचे काँक्रिटीकरण झाले. गार्डन बगीचा सुशोभीकरण तटबंदीचे भूमिपूजन (bhumipujan) झाले.

यापैकी तटबंदी बारवेला करण्याऐवजी वॉलकंपाउड म्हणून उरकण्यात आले आणि बारवेचा जीर्णोद्धार बाजूला गेला. परिणामी आज बारवेची दुर्दशा झाली आहे. बारवेच्या काठावर म्हाळासादेवी ट्रस्टने भक्तनिवास उभारले पण बारव मात्र कायमच उपेक्षित राहिली. काही वर्षापूर्वी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा (Water supply) करणारी ही बारव आज तळाशी गेलेला पाणीसाठा व पडलेले चिरे आणि दगडांसह टाकण्यात येणार्‍या घाणीचे आगार झाले. परंतु ही बाब गावातील काही होतकरू वैचारिक युवकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रमदानाने साफसफाई व जमेल तशी दुरूस्ती करण्याची तयारी केली आहे. तसेच गावकर्‍यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

युवकांचा हा उत्साह एक ऐतिहासिक ठेवा वाचविण्याचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. ग्रामस्थ आणि राजकारणातच मश्गूल असणारे व सदैव याच बारवेच्या आसपास गप्पागोष्टी करण्यात दंग असणार्‍यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे या तरुणांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्यानिमित्त हाती घेतलेल्या या उपक्रमात किरण ढोबळे, सुरज शिंदे, तुषार पडोळ, राजू पडोळ, केशव आष्टेकर, गोरख चकोर, ओम पानगव्हाणे, कार्तिक मुरकुटे, सागर मुरकुटे, सचिन बोबंले, गणेश मुरकुटे, शुभम नवगिरे, सागर मुरकुटे आदी मुले काम करीत आहेत.

पाण्याचा पिण्यासाठी वापर व्हावा साधारण 30 वर्षापूर्वी या बारवेच्या पाण्याचा वापर गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी करीत होते. गावातील ग्रामदैवत म्हाळसादेवीच्या दर्शनापूर्वी या बारवेचे दर्शन घेऊन नंतर भाविक मंदिरात जात होते. या बारवे ची पुन्हा स्वच्छता होऊन तिच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व्हावा हाच आमचा उद्देश आहे.

बारव बचाव समिती, म्हाळसाकोरे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *