Saturday, April 27, 2024
Homeजळगावअल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या दोघं तरुणांची धुलाई

अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या दोघं तरुणांची धुलाई

जळगाव – Jalgaon

शहरातील गोलाणी मार्केट (Golani Market) येथे एका दुकानाच्या बाहेर वडील सोबत असतांना अल्पवयीन मुलीची दोन मुलांनी छेड काढल्याची घटना रविवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. मुलीकडून प्रकार समजल्यावर मुलीच्या वडीलांसह इतर नागरिकांनी दोघा मुलांना चांगलाच चोप दिला. यादरम्यान मुलांनी सोबत आणलेली दुचाकी जागेवरच सोडून पळ काढला. याप्रकरणी उशीरापर्यंत (Police) पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

- Advertisement -

शहरातील एका भागातील अल्ववयीन मुलगी रविवारी दुपारी वडीलसोबत गोलाणी मार्केट येथे आली होती. तिचे वडील दुकानात काहीतर वस्तू घेण्यासाठी गेले असता, बाहेर एकट्या उभ्या असलेल्या मुलीला हातवारे करत, दोन तरुणांनी छेड काढली, यातदरम्यान तिचा हात पकडण्याचाही प्रयत्न केला.

मुलीने वडीलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी तसेच यावेळी मार्केटमध्ये असलेल्या इतर नागरिकांनी दोघां तरुणांचा चांगलाच चोप दिला. नागरिक चोप देत असतांना दोन्ही तरुण त्यांनी सोबत आणलेली एम.एच.१९ डी. एल. २४८१ या क्रमाकांची दुचाकी घटनास्थळावर सोडून पळ काढला. भरदिवसा वडीलसोबत असलेल्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेची मार्केटमध्ये एकच चर्चा होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत गोलाणी मार्केटमध्ये घटनास्थळावर संबंधित छेड काढणार्‍या तरुणांची दुचाकी उभी होती. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी कोणतीही तक्रार न दिल्याचे पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या