Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसनपाच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

सनपाच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

सटाणा । प्रतिनिधी | Satana

येथील नगरपालिकेच्या (Municipalities) आगामी निवडणुकीसाठी (election) 12 प्रभागातील 24 जागांसाठी आरक्षण (Reservation) सोडत काढण्यात आली.

- Advertisement -

त्यात 12 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून चक्राकार व मतदार संख्येनुसार प्रभाग क्र. 10 अ व 12 अ या दोन जागा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी तर प्रभाग क्र. 3 अ अनुसूचित जमातीसाठी राखीव (Reserved for Scheduled Tribes) ठेवण्यात आली आहे.

सनपा सभागृहात प्रशासक तथा बागलाणचे प्रांत बबनराव काकडे (Bablanrao Kakade province of Baglan) यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 13) सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत बैठकीस प्रारंभ झाला. मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी सोडतीबाबत चक्राकार पध्दतीची माहिती दिल्यानंतर बागलाण इंग्लीश मेडियम स्कुलचा विद्यार्थी नमन अजमेरा व मनीबाई अग्रवाल बालविकास मंदिरची विद्यार्थीनी समिक्षा सोनवणे यांच्या हस्ते बंद डब्यातून आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

आरक्षण सोडतीकडे नवोदितांसह प्रस्थापित इच्छुकांचे लक्ष लागून होते. त्यामुळे सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांनी बैठकीस गर्दी केली होती. बैठकीच्या सुरवातीलाच भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार यांनी प्रभाग रचनेसंबंधी प्रश्न उपस्थित केले. बैठकीस मनोज सोनवणे, मुन्ना शेख, संजय सोनवणे, हर्षवर्धन सोनवणे, अनिल सोनवणे, धनंजय सोनवणे, सनपा प्रशासनाधिकारी विजय देवरे, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस, कार्यालयीन अधिक्षक माणिकराव वानखेडे आदी उपस्थित होते.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. 1 अ अनु. जमाती महिला, 1 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 अ महिला, 2 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 3 अ अनु. जमाती, 3 ब महिला, प्रभाग क्र. 4 अ महिला, 4 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5 अ महिला, 5 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 6 अ महिला, 6 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 7 अ महिला, 7 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 8 अ महिला, 8 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 9 अ महिला, 9 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 10 अ अनु. जाती महिला,

10 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11 अ महिला, 11 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. 12 अ अनु. जमाती महिला, 12 ब सर्वसाधारण. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही इच्छुकांचा हिरमोड झाल्याने त्यांनी आरक्षण सोडतीस आव्हान देण्याची तयारी केली असून काहींच्या दृष्टीने सोयीचे आरक्षण निघाल्याने त्यांनी मात्र आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणी देखील सुरू केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या