Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककामगारांना बोनसची प्रतीक्षा

कामगारांना बोनसची प्रतीक्षा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

दिवाळी (diwali) आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने कामगारांना (workers) सध्या वेतनासोबतच बोनस (bonus) हाती पडण्याची प्रतीक्षा वाढली आहे. उद्योग क्षेत्रात संमिश्र वातावरण असल्याने या आघाडीवर पारसे उत्साहवर्धक चित्र दिसून येत नाही.

- Advertisement -

करोनाच्या (corona) लॉकडाउननंतर (lockdown) उद्योग क्षेनिे घेतलेली उसळी लक्षात घेता यंदाची दिवाळी उद्योग क्षेत्रात चांगली’ होणार अशी चर्चा दिसून येत आहे. दिवाळीत उद्योगांना किमान पाच दिवसांच्या सुट्या राहतात. या सुट्या भरून काढण्याच्या सोबतच च दिवाळीपूर्वीच्या ऑर्डर्स पूर्ण करण्याची लगबग उद्योगक्षेत्रात पाहायला मिळते आहे.

दिवाळीतील सुट्या भरून काढण्यासाठी तीन आठवड्यांपासून बहुतांश उद्योगांत शनिवारीच्या सूट्या रदद करण्यात आल्या आहेत. महत्वाच्या अनेक कंपन्यांचे वेतन (salary) व बोनस ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीच्या तोंडावर होणार असल्याने कामगारांमध्ये संमीश्र भावना दिसून येत आहेत. दिवाळी सणातील वसुबारस 1 नोव्हेंबरला येत आहे. या सणापासूनच खर्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होत आहे

दरवर्षी दिवाळीच्या किमान एक आठवडा आधीच कामगारांना बोनस वाटप केले जात होते. त्यामुळे कामगारांची खरेदी निवांत काळात करणे शक्य होत होते. मात्र गेल्या काही काळापासून वेतनासह बोनस उशिराने दिले जात असल्याने कामगारांमध्ये काही अंशाने नाराजी दिसून येत आहे. उद्योग क्षेत्रातील दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन लक्षात घेत कामाचे नियोजन केले जाते व दिवाळीपूर्वीच ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी शनिवारी सुटीच्या दिवशीही उत्पादन वेगाने घेऊन पूरवठा सूरळीत ठेवण्याचा प्रयत्न उद्योजकांचा चाललेला आहे.

महावितरणकडून (MSEDCL) दर शनिवारी औद्योगिक वसाहतीतील (Industrial colony) दुरुस्ती, देखभाल स्थगित करुन नियमित वीजपुरवठा केला जात असल्याने उद्योगांचे कामकाज वेगाने सुरू आहे. दिवाळीकरिता बहुतांश कंपन्या 20 टक्के तर काही कंपन्या 8.33 प्रमाणे बोनस करीत असतात. तर काही बड्या कंपन्या वेतन वाढ करारातच बोनसची रक्कम निश्चित करीत असल्याने त्या कामगारांमध्ये बोनसची चिंता दिसून येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या