Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोदींच्या गँरंटीविरोधात कौल द्या

मोदींच्या गँरंटीविरोधात कौल द्या

उगाव/नैताळे वार्ताहर

देशाने अनेक सरकार पाहिले आहे वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती विकासाचा विचार होता म्हणून लोकशाही टिकली होती. अलीकडे सगळी परिस्थिती बदलली आहे सरकार गॅरंटी कसली देते. देशात रोजगार कमी झाला, शेतीमालचे भाव पाडले, कांदा, ऊस, द्राक्ष यांचे भाव गडगडण्याची गॅरंटी सरकार देते का. दिलेले आश्वासन पाळले का त्याची गॅरंटी घेत नाही, केवळ आश्वासने दिली, सगळीकडे हुकूमशाही सुरु आहे देशात दहशत निर्माण केली जात आहे, देश वाचवायचा आहे चिंता संविधान वाचवण्याची आहे या देशाची घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटी बद्द आहोत, फक्त साथ तुमची हवी आहे बदलाची सुरुवात तुमच्या पासून करूया अशी साद माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी निफाड येथील विराट महाएकजुट सभेत घातली.

- Advertisement -

मंचावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा संजय राऊत खा अमोल कोल्हे ,जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसेङ्गङ्गमहिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे , कोंडाजी आव्हाड ,राजराम पानगव्हाणे, शरद आहेर हेमंत टकले आमदार सुनिल भुसारा ,जे पी गावित ,नानासाहेब बोरस्ते शीराम शेटे, माजी आमदार अनिल कदम ,जयंत दिंड, माजी आमदार कल्याणराव पाटील विक्रम रंधवे ,राजेंद्र मोगल ,राजेंद्र बोरगुडे ,पुरुषोत्तम कडलग,मेहबुब शेख ,गोकुळ पिंगळे ,माणिकराव शिंदे आमदार नरेंद्र दराडे दिलिप मोरे नवनाथ.बोरगुडे ,शिवाजी बोरगुड, अशोक ढवळे सुधाकर बडगुजर आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड यांनी विद्यमान आमदार दिलिप बनकर यांच्या कार्यशैलीवर तोंडसुख घेतले सामान्य कार्यकर्त्यावर सत्तेचा दाब टाकुन कारवाई करतात जिल्हा बँकेच्या सत्तेतुन आमदार माणिकराव कोकाटे व आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हा बँक लुटली शरद पवारांचे नाव वापरुन बाजार समिती व इतर सत्तास्थाने मिळविले आहे त्यापेक्षा अनिल कदम हे कर्तृत्वाने सरस असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.खासदार अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातबंदीने सुमारे दोन हजार कोटींचा फटका शेतकर्यांना बसला आहे अन सहा हजार देऊ करुन शेतकर्यांची चेष्टा सुरु , असल्याची टीका केली.आ.जयंत पाटील यांनी यावेळी बोलतांना दहा वर्ष उलटुनही शेतकरी कर्जमाफी नाही शेतकरी कामगारविरोधी कायद्यांद्वारे गळचेपी सुरु आहे . अब की बार चारशे पारच्या घोषणां देणार्‍यांना जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले,

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले कि इतिहास लढणार्‍याचा लिहिला जातो गद्दारांचा नाही मराठी माणसांचा इतिहास तेच सांगतोय कि गद्दार लोकांना माफी नाही महाराष्ट्र राज्यात परत हे सरकार येणार नाही ही आमची गॅरंटी आहे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणे ही तुमची गॅरंटी आहे, बाळासाहेब ठाकरे नसते तर आज राममंदिर उभे राहिले नसते निवडणूक आली नवीन जुमला तयार करायचा, द्राक्ष पंढरीत शेतकर्‍यांवर संकट आले तेव्हा कोणी आले नाही. माजी आमदार अनिल कदम यांनी भाषणातुन पवारांचे गुणगाण गायले.

यावेळी भास्कर भगरे ,दिलिप मोरे, राजेंद्र मोगल जे पी गावित विक्रम रंधवे,नानासाहेब बोरस्ते कोंडाजी आव्हाड ,शीराम शेटे भाषणे झाले. यावेळी मधुकर शेलार ,साहेबराव ढोमसे , संजय कुंदे, प्रभाकर मापारी, सचिन गिते जनार्दन देवरे, सुनील निकाळे, विजय जाधव, सुधीर कराड, महेश पठाडे , खंडु बोडखे ,गोकुळ गिते , पृथ्वीराज मोगल , जयवंत मापारी पतिंग ढोमसे शिवा ढोमसे संदिप शिंदे अँड प्रविण ठाकरे अँड रामनाथ सानप अँड प्रमोद आहेर सोमनाथ पानगव्हाणे सचिन खडताळे आदीं पस्थित होते. सुत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या