Thursday, April 25, 2024
Homeनाशिककुणी स्वयंसेवक होत का, स्वयंसेवक ?

कुणी स्वयंसेवक होत का, स्वयंसेवक ?

नाशिक । Nashik

मार्च महिन्यात येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्वयंसेवक मिळेनासे झाले आहेत. संमेलनात खासगी सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्यास मागणी नोंदविण्याकडे सुरक्षा समितीने बैठकीत लक्ष वेधले.

- Advertisement -

तेव्हा संयोजकांनी खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संमेलनात पोलीस, गृहरक्षक दलाचे पूर्णत: सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षकांची गरज पडणार नाही. त्याऐवजी स्वयंसेवकांची मदत घेण्याचे सूतोवाच करण्यात आले.

संमेलनस्थळी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार नाही. या कामात पोलीस, गृहरक्षक दलाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. स्वयंसेवकांवर काही जबाबदारी सोपविण्याचा संयोजकांचा मानस आहे.

संमेलनस्थळी मुख्य सभामंडप, अन्य कार्यक्रमांचे ठिकाण, ग्रंथप्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, भोजन व्यवस्था आदींचे नियोजन कसे असेल, यासंबंधीचा आराखडा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मांडला. हा आराखडा मान्यतेसाठी प्रशासनास सादर करण्यात आला आहे. संमेलनासाठी स्वयंसेवक मिळणे अवघड झाले आहे. करोनाचे गडद होणारे सावट आणि संमेलनकाळात होणार्‍या परीक्षा यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या