Thursday, April 25, 2024
Homeजळगावराजकीय नेत्यांचे दौरे , अन तालुक्याच्या उन्हाच्या तापमानात वाढवल तापमान !

राजकीय नेत्यांचे दौरे , अन तालुक्याच्या उन्हाच्या तापमानात वाढवल तापमान !

तालुक्यात उष्णतेच्या वाढलेला पारा शेतकरी वर्गाला आपली केळीचे पिक वाचवण्याची पडलेली चिंता आणि त्यातल्या त्यात आता लोकप्रतिनिधींचे यावल तालुक्यातील दौरे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान पुन्हा तेज झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या पक्षाला कसा फायदा होईल यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असले तरी चार महिने पुढे लोटले गेलेले निवडणूक या संधीचा फायदा नेमका कोणाला मिळतो याबाबत चर्चा सुरू आहे

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निश्चितच सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यामध्ये कधी उष्णतेची लहर तर कधी वादळी वारे . याच वादळी वाऱ्यांच्या पाठोपाठ आता राजकीय नेत्यांचे अचानक संपर्क वाढला असताना कार्यकर्त्यांमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे .

- Advertisement -

स्वर्गीय खासदार व आमदार हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर आता भाजपाचे काहीही उरलेले नाही असं म्हणणाऱ्या काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांचे वरिष्ठ नेते यावल तालुक्याचे काहीना काही कारणाने जी दौरे करत आहेत त्यामुळे निश्चितच पुढचे वातावरण ढवळून निघण्याची सारखे आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे मात्र आमदार शिरीष चौधरी च्या माध्यमातून तालुका समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांना देण्यात आलेल्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यामुळे कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असलेले काँग्रेसचे कार्यक्रम तालुक्यात चर्चेत ठरतात तसेच गेल्या त्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री विषयी जी पोस्ट टाकली त्या पोस्ट च्या संदर्भात गीत सब राग दिली तेही चर्चेतच आहे

स्वर्गीय हरिभाऊंच्या जाण्याने निश्चितच भाजपा मध्ये पोकळी निर्माण झाली तसे दिसत असताना मात्रक कार्यकर्त्यांची उभारलेली फळी ही कामाला लागल्याने खचून गेलेली दिसत नाही स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपापल्या परिसरात व गावांमध्ये कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले दिसत असून कालच माजी मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी कोरपावली तालुका यावल येथे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनल येथील माजी चेअरमन व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राकेश फेगडे या तरुण कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली जे संचालक निवडून आलेत त्यांच्या सत्कारासाठी चक्क कोरपावली घाठलं . व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात . त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील भाजपा ची फळी यांना बळ मिळाले असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत हे स्पष्ट दिसत आहे

तसेच माजी मंत्री तथा सध्या राष्ट्रवादीमध्ये ज्यांनी भाजपा सोडून प्रवेश केला आहे ते नाथाभाऊ यांनीसुद्धा यावल तालुक्यात अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी भेट दिली . नव्हे तर पूर्वाश्रमीचे त्यांचे मित्र जे आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अशांच्या घरी जाऊन त्यातील एक उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश आबा पाटील दहिगाव यांच्याशी घरी जाऊन हितगुज केले आणि तिथून आल्यानंतर यावल मध्ये यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा नाथाभाऊ चे लाडके कार्यकर्ते अतुल पाटील यांचे दुकानात बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला . नव्हेतर तुकडेबंदी कायद्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी ज्वलंत प्रश्न त्यांच्यासमोर मांडला त्यासंदर्भात मंत्रालयातील सचिवांची चर्चाही केली आता पुढे काय निर्णय व्हायचा तो होईल मात्र कार्यकर्त्यांचे प्रश्नाला वाचा फोडण्याच त्यान काम केले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे .

तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यावल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखे मध्ये भेट दिली त्यांचा सत्काराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी समोर आली तर नव्हे तर रावेर येथील श्रीराम पाटील यांनीही अचानक यावल लिखे त्यांच्यासमवेत जळगाव येथील सुप्रसिद्ध असे गोपाल दर्जी यांनी अनेक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत व्यक्तिमत्व घडविले असे गोपाल दर्जी यांच्यासोबत दौरा केला भुसावळ टी पॉइंट वर सामान्य माणसासारखे एका दुकानांमध्ये बसून अतुल पाटील व पत्रकारांची अनौपचारिकरीत्या चर्चा केली ही सर्व पुढील राजकीय भवितव्याची जुळवाजुळव साठीच धावपळ दिसून येत असल्याचे आता समोर चर्चिले जात आहे तसेच यावल तालुक्यात काँग्रेसची आता राज्यात आघाडी सरकार असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून व आमदार शिरीष चौधरी आणि प्रभाकर आप्पांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते जोमाने कामाला लागत दिसत आहे.

तालुक्यात कुठे ना कुठे काहीना काही कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून घेतली जाताना दिसत आहेत कालपरवाच सरपंच चषक तसेच कोरपावली पंधराव्या वित्त आयोगाचे कामाचे उद्घाटन गेल्या त्यात बामणोद येथे उपकेंद्राचे लोकार्पण अशा कुठल्या न कुठल्या कारणाने काँग्रेसही मागे नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फैजपूर येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी विषयी जी पोस्ट टाकली त्या पोस्ट टाकणाऱ्या ला दिलेला चौक यामुळे तालुक्यात वातावरण ढवळून निघालेले दिसत आहे

नव्हे तर खासदार रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून केळी वाहतुकीसाठी व्या घेन आता निंभोरा रावेर स्टेशन कडून कानपूर कडे हिरवी झेंडी दाखवून रवाना झाली त्यामुळे शेतकऱ्यांना आता समाधान वाटू लागले असून जि व्याघन सुरू झालेली आहे ती आता मात्र बंद होणार नाही याची काळजी रक्षाताई खडसे व प्रशासनाने घेतली तर शेतकऱ्यांचा थोड्या अंशी गेल्या आठ-दहा वर्षापासून जी केळी उत्पादनामध्ये उत्पादित खर्चावर आधारित उत्पन्न येत नव्हते ते भरून निघण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यात मात्र नुसत्या व्यापाऱ्यांचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांच्या पदरात ही काहीतरी पडेल याचा विचार होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे

यावल तालुक्यात सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घट होत आहे सातपुड्यातील फ्लड कॅनाल च्या निर्मितीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेची असून यावल रावेर तालुक्यात केळी पिकावर एक प्रकल्प उभारणे गरजेचे आहे तसेच वीज मंडळाकडून काही तासापूर्वीच वीज मिळते त्यामुळे पूर्ण ओलिताखालील क्षेत्रात पाणी भिजवता येत नाही शेतकऱ्यांच्या व्यथा दिवसेंदिवस वाढत आहे अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा केळीची काटन करून दिलेले नाहीत काहींनी तर यावल शहरातून पलायन केले आहे याकडे या साऱ्या लोकप्रतिनिधींनी जसे आपण राजकीय पोळी भाजण्यासाठी फिरतात त्या शेतकऱ्यांच्या व्यथा न कडेही लक्ष देणे गरजेचे आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या