Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश...तर बरे झालेल्यांनाही पुन्हा होऊ शकतो करोना

…तर बरे झालेल्यांनाही पुन्हा होऊ शकतो करोना

नवी दिल्ली –

करोनाची लागण झाल्यानंतर शरिरात त्याविरुद्ध अँटीबॉडीज बनू लागतात. मात्र एका निश्चित काळानंतर अँटीबॉडीज कमी होतात आणि अशा स्थितीत पुन्हा

- Advertisement -

करोना संक्रमणाचा धोका उद्भवतो, असे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. एकदा करोना होऊन गेल्यानंतर तो पुन्हा होत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असे आवाहन करून आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव पुढे म्हणाले की, करोना संसर्गाच्या संदर्भात सातत्याने अभ्यास केला जात आहे. नवनवीन तथ्येही समोर येत आहेत. शरिरात अँटीबॉडीज कायम राहण्याची वेळ विविध संशोधनात वेगवेगळी सांगण्यात आली आहे. एका अभ्यासात ही वेळ तीन महिने सांगण्यात आली आहे, तर दुसर्‍या अभ्यासात ती पाच महिने सांगण्यात आली आहे. संशोधन सुरु आहे, पण अँटीबॉडीज कमी झाल्यानंतर संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो. युरोप, चीन, अमेरिका, रशिया तसेच इतर ठिकाणच्या वैज्ञानिकांनी शरिरात अँटीबॉडीज कायम राहण्याच्या वेळेबाबत संशोधन केले आहे. पुणेस्थित एनआयव्ही संस्थेकडूनही यावर अभ्यास सुरु आहे. एनआयव्हीच्या संशोधनाचा निष्कर्ष येत्या डिसेंबर महिन्यात येणे अपेक्षित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या