विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | Mumbai

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघाती (Vinayak Mete) निधन झाले. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचं वृत्त समजताच तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक बड्या नेत्यांनी एमजीएम रूग्णालयामध्ये धाव घेतली. एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना विनायक मेटे यांच्या अपघाताची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मेटेंच्या कारला डाव्या बाजूने जोरदार धडक देण्यात आली आहे. त्यानंतर धडक देणारा ट्रक चालक पळून गेला आहे. आता सीसीटीव्हीच्या आधारे ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. ८ पथकं सध्या यासाठी रवाना करण्यात आली आहेत.