Friday, April 26, 2024
Homeनगरगावातील इनामी जमिनीवर ग्रामसभेत चर्चा

गावातील इनामी जमिनीवर ग्रामसभेत चर्चा

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगावची ग्रामसभा विविध विषयावर चर्चा होवून खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

- Advertisement -

सरपंच सागर बढे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. मागील सभेपासून आजपर्यंत झालेल्या खाते निहाय जमा खर्च ग्रामविकास अधिकारी टी. के. जाधव यांनी वाचून दाखविला. सभेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, 15 वित्त आयोग 2020-21 मधील शिल्लक असलेली कामे, पंधरा वित्त आयोग सन 2021-22 व 22-23 मधील कामांना मंजुरी देणे, विधवा एकल महिला सर्वेक्षण, प्रधानमंत्री शबरी रमाई आवास योजना जागा नसलले लाभार्थी, गोंडेगाव-जळगाव नायगाव रस्ता, जन सुविधा अंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम प्रस्तावास मान्यता देणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, अंतर्गत कामांना मंजुरी देणे, मतदानकार्ड आधारकार्डशी लिंक करणे, पीएम किसान योजना, घरपट्टी पाणीपट्टी व इतर थकबाकीदार लोक अदालत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस लोकवर्गणीतून कमान बांधणे, गावातील सर्व शासकीय जागेची जमिनीची नोंद सातबारावर घेऊन शासन किंवा ग्रामपंचायतीच्या नावे करणे, गाव तलाव, रस्ते महाराजस्व अभियान, वेडू आई मंदिर ते मारुती मंदिर रस्ता, मातुलठाण रोडला बाह्यवळण करणे, आरो प्लांट दुरुस्ती करणे, इनामी जमीन परत घेणे, गावातील सर्व अतिक्रमण काढणे, सार्वजनिक विहीर दुरुस्ती, डासांची फवारणी या विषयावर चर्चा झाली.

ग्रामसभेस उपसरपंच रवींद्र भानुदास आमले, प्रदीप जगताप, अनिल कुर्‍हाडे, सोपान शेलार, विजय कासार, गंगाधर बाबुराव थोरात, शरद काशिनाथ कदम, विठ्ठल रावसाहेब तांबे, युवा नेते शंतनू फोपसे, अरविंद ढगे, अविनाश दिवटे, अमोल तांबे, चांगदेव बढे, दत्तात्रय बढे, किशोर म्हैस, रामदास बडदे, ज्ञानदेव बढे, अमोल पिंजारी, सिद्धार्थ कदम, बाळासाहेब तांबे, शिवाजी पिंजारी, नवनाथ निर्मळ, रघुनाथ चौधरी, उद्धव कोळसे, बापू बडाख, वाल्मीक तांबे, बबन नन्नवरे, कचरू थोरात, आबानाना बढे, बाबुराव कदम, हेमंत गायकवाड, काळू कुर्‍हाडे, बाबासाहेब बढे, गणेश भीमराव बडधे, जालिंदर खडके, भगीरथ म्हैस, विठ्ठल कुर्‍हाडे, रावसाहेब तांबे, संदीप कोळसे, लक्ष्मण ठोंबरे, गंगाधर कुर्‍हाडे, विजय कदम, भिकन शेख, किरण गरुड, दीपक कदम, सुजित म्हैस, रावसाहेब बढे, गोकुळ म्हैस, कैलास फोपसे, जनार्दन फोपसे, मारुती तांबे, गणपत फोपसे, एकनाथ फोपसे, तुकाराम कदम, रवींद्र फोपसे, अन्वर चांद सय्यद, संदीप फोपसे, अमोल थोरात, बबन दिवटे, सीएचओ रवींद्र लांडे, अंगणवाडी सेविका पद्मा चौरे, पुष्पा कणसे, कुसुम गिरी, आशा सेविका सुनंदा आमले, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप शेलार, सतीश म्हैस, दत्तात्रय सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील इनामी जमिनी तसेच देवीच्या व इतर देवस्थानच्या जमिनी अनेक वर्षापासून काही ठरविक नागरिकांकडे असून त्या परत शासनाकडे किंवा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात याव्यात, असा ठराव करून त्या जमिनी परत केल्या नाही तर त्या नागरिकांवर गुन्हे दाखल करावे, अशी सूचना युवा नेते शंतनू फोपसे यांनी केली. गावात वृक्षतोड करण्यात आली. ग्रामपंचायतीने सबंधीत विभागाची पूर्व परवानगी न घेता झाडे तोडून त्याची विल्हेवाट लावली, यावर ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याचे फोपसे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या