थोरातांविरूद्ध विखे दूधावरून गरम

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर /आश्वी ahmednagar – इंदोरीकर महाराजांच्या भेटीसाठी संगमनेर sangamner तालुक्यातील ओझर येथे पोहचलेल्या माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil यांनी अप्रत्यक्षपणे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात balasaheb thorat यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या दूध संघातून मलिदा खाण्यासाठीच काही मंत्री दूध milk price दरवाढ होवू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसर्‍याच्या हाती असल्याचेही ते म्हणाले.

सध्याच्या सरकारमधील अनेकजण विरोधात असताना तत्कालीन सरकारवर फेकू सरकार असल्याची टिका करत होते. पण सध्या शेतकर्‍यांची फसवणूक सुरू आहे. दूधदरवाढ मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यावरून या सरकारने आपल्याच आरोपांची उजळणी केली पाहिजे, असे ते म्हणाले.

आपल्या नफ्यातून दूध उत्पादकांना मदत करावी आणि सरकारने दूधाला १०रूपयांचे अनुदान तातडीने द्यावे आशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आ.विखे पाटील म्हणाले की युती सरकारच्या काळात जी मंडळी दुधाच्या अनुदानासाठी विधीमंडळाच्या पायर्यांवर बसून सरकारच्या विरोधात घोषणा देत होती आज तीच माणस सतेत आहेत.परंतू त्यांना आपल्याच घोषणांचा सोयीस्कर विसर पडला असल्याचा टोला लगावून आ.विखे म्हणाले की,दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेवून शेतकऱ्यांची मागील सरकारने पाच रुपयांचे अनुदान देवून यासाठी निधीची तरतूद केली.मग आताच्या सरकारला अडचण काय आहेॽ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुध उत्पादकांना हमीभाव आणि अनुदान देण्यास या सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. गेली अनेक वर्षे दूधसंघ चालविणारे आणि ,महानंदाची सता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी तरी अडचणीच्या काळात दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहीले पाहीजे, आजपर्यत झालेल्या नफ्यातून दूधसंघानी उत्पादकांना मदत करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *