Vietnam Fire : नऊ मजली इमारतीला भीषण आग, अनेक जणांचा होरपळून मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

व्हिएतनामची राजधानी हनोई येथील नऊ मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आग १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास लागली. ९ मजली इमारतीत या आगीचा भडका उडाला. इमारतीमध्ये जवळपास १५० जण राहत होते.

हनोई शहरातील दाटीवाटीच्या भागात असलेल्या या इमारतीत आग लागल्यानंतर बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले. अपुऱ्या जागेमुळे बचावकार्य वेगाने करता येत नव्हते. आग लागलेल्या इमारतीमधून ७० जणांना वाचवण्यात आले. यातील ५४ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. आगीबाबत प्रत्यक्षदर्शींनी अशी माहिती दिली की, आग लागल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. लोक मदतीसाठी ओरडत होते. एका महिलेने सांगितलं की अपार्टमेंट पूर्ण बंद होतं आणि लोकांना बाहेर पडण्यासाठीही जागा नव्हती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *