Vidhan Parishad Election 2023 : सत्यजीत तांबेंचा मार्ग खडतर? नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई | Mumbai

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाल्याची चर्चा आहे; कारण भाजपने इथे शेवटपर्यंत आपला उमेदवार जाहीर केला नाही. तर काँग्रेसचे (Congress) उमेदवार सुधीर तांबे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनीदेखील या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांनी आपला अर्ज मागे घेत मुलगा सत्यजित यांना पाठिंबा दिला. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या पिता-पुत्रांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. या राजकीय घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा; सुविधा अन् भाडे ऐकून हैराण व्हाल

‘सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असे पटोले यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमधील बंडखोर उमेदवाराला कॉंग्रेस कधीही पाठिंबा देणार नाही. तांबे यांच्या बंडखोरीविषयी हायकमांडला सर्व अहवाल देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हायकमांडच्या निर्देशानुसार पुढील पाऊल उचलणार आहे.

बाळासाहेब थोरात आणि माझा काही संपर्क झाला नाही. भाजप सध्या घरं तोडण्याचा आनंद घेत आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल, तेव्हा त्यांना कळेल. त्यावर काही बोलायच नाही. पण पुढील कारवाई हायकमांडच्या निर्देशानंतर होईल, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. भाजपचे भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्यावेळी दुसऱ्याचं घर फोडण्याचे काय दुःख असते हे भाजपला कळेल, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजित तांबे काय म्हणाले होते?

‘असं आहे की, आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की, यावेळेस काँग्रेसमधील अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र, निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी तो जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी मी फॉर्म भरला. तरीपण मी फॉर्म भरताना दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे. परंतु माझ्या नावाचा AB फॉर्म हा वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलं आहे. हे जरी खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे. सगळ्यांना मी विनंती करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना देखील भेटणार आहे. मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी भाजपच्या सर्व नेत्यांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षाच्या विचारसरणी आणि सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं. अशी माझी अपेक्षा आहे.’

‘मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा मी प्रयत्न करणार आहे. अद्यापपर्यंत मी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी बोललेलो नाही. इथून पुढच्या काळात मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे. हे लक्षात घ्या की, काँग्रेस पक्षाच्या कोट्यात ही जागा आली होती. काँग्रेस पक्षाने निर्णय घ्यायचा होता की, कोण उमेदवार असणार आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की, सुधीर तांबे हे उमेदवार असतील. मात्र, आमच्या परिवारामध्ये, माझे हितचिंतक, मित्र, कार्यकर्ते आणि आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते ज्यामध्ये आमचे एच के पाटील, थोरात साहेब असतील, नाना पटोले असतील या सगळ्यांशी आमची चर्चा झाली. सगळ्यांनी असं सांगितलं होतं की, सत्यजीत तुम्हीही या ठिकाणी लढू शकता. परंतु वेळेवर जाहीर होताना डॉ. सुधीर तांबेंचं नाव जाहीर झालं. त्यामुळे जो AB फॉर्म आहे तो मला मिळू शकला नाही 3 वाजेपर्यंत. त्यामुळे माझी उमेदवारी ही अपक्ष आहे.’

अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं

‘मी सर्व पक्षाच्या नेत्यांना अगदी मनसेपासून सर्वांना विनंती करणार आहे की, एका उदात्त हेतूने राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं मला मदत करावी असा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की, माझ्यासारखा कार्यकर्ता 22 वर्ष हा संघटनेमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करतोय. युवकांचे विविध प्रश्न मांडून आजपर्यंत मी राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करतोय. आता हेच प्रश्न आता मोठा पटलावर घेऊन ज्यायचे असतील तर विधान परिषदेसारखा चांगला प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मला जर सगळ्या राजकीय पक्षाने मदत केली तर हे प्रश्न मी अधिक ताकदीने मांडू शकतो. भाजप मला पाठिंबा देईल की नाही देईल हा त्यांच्या पक्षाच्या प्रश्न आहे. पण मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंत करणार आहे की, त्यांनी मला पाठिंबा द्यावा. कारण की, महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे की, एकमेकांना मदत करण्याची भूमिका ठेवली आहे. अनेक विधान परिषदेच्या निवडणुका या आपण बिनविरोध केल्या आहेत. अनेक विधानसभेच्या निवडणुका आपण बिनविरोध केल्या आहेत. यामुळेच मला असं वाटतं की, मोठ्या मनाने सर्व राजकीय पक्षाने त्यांनी मला पाठिंबा द्यावा.’

‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवली पाहिजे. परंतु काही तांत्रिक कारणं किंवा विसंवादामुळे मला माहित नाही.. पण डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली.पण माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.’ असं म्हणत सत्यजीत तांबेंनी काँग्रेसमध्ये विसंवाद होता हे मान्य केलं. पण तरीही आपण काँग्रेसपासून काही फारकत घेतलेली नाही असंही स्पष्ट केलं.

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांना गेल्या महिन्यातच सूचक इशारा दिला व्होता. सत्यजित तांबे यांनी आपल्या सिटिझन विल या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या उपस्थित पार पाडले. फडणवीस यांनी बोलताना बाळासाहेब थोरात यांना उद्देशून सत्यजित तांबे यांना अजून किती दिवस सभागृहाच्या बाहेर ठेवणार? असा सवाल केला होता. आमच्यासारख्यांचा अशा चांगल्या नेत्यांवर डोळा असतो. चांगली माणसे जमवावीच लागतात, असे फडणवीस म्हणाले होते.