Friday, April 26, 2024
Homeधुळेधर्मभास्कराच्या भ्रष्टाचाराला सुरुंग लावणारे व्रतस्थ पत्रकार जगतराव सोनवणेंचे निधन

धर्मभास्कराच्या भ्रष्टाचाराला सुरुंग लावणारे व्रतस्थ पत्रकार जगतराव सोनवणेंचे निधन

धुळे Dhule| प्रतिनिधी

साधारणतः ३० वर्षांपुर्वी देशभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषदेतील भास्कर वाघ Bhaskar Wagh from Dhule Zilla Parishad याच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड Billions of rupees of corruption exposed करणारे, असंख्य संकटे झेलूनही पत्रकारतेशी इमान राखून लेखनीची धार अबाधित ठेवणारे तथा शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे कायद्याचे अभ्यासक, व्रतस्त पत्रकार जगतराव सोनवणे Journalist Jagatrao Sonawane यांचे अल्पशा आजाराने निधन Died झाले. धुळ्यातील पांझरा काठी असलेल्या अमरधाममध्ये आज शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

- Advertisement -

श्री.सोनवणे यांनी धुळ्यातून मतदार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. स्वतःच संस्थापक संपादक असल्याने आपल्या लेखीनीच्या जोरावर अनेक विषयांना वाचा फोडली धर्म भास्कराचा घोटाळा खणून काढल्यामुळे त्यांचे नाव देशभर पेाहचले. अर्थात याप्रकरणात त्यांना तत्कालीन राजकीय नेत्यांनी गावगुंडांनी प्रचंड त्रास दिला. त्यांना संपविण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्यांना व त्यांच्या कुटंुंबियांना त्यावेळी झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. राज्यातील त्यावेळचा सगळ्यात मोठा आणि पहिला घोटाळा उघडकिस आणल्याने धुळ्याचे नाव कु-अर्थाने बदनाम झाले. तर झुंजार, तटस्थ पत्रकार म्हणून जगतराव सोनवणेंचे नाव सर्वदूर आदराने घेतले जावू लागले.

भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंडित पा.वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक अशीही जगतरावनाना यांची ओळख होती. अल्पशा आजारामुळे धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आज १२ ऑगस्ट रोजी, दुपारी साडेतीन वाजता धुळ्यातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. बुधगाव (ता.चोपडा) हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अंतिम इच्छा अपूर्ण राहिली

श्री.जगतराव नानांनी मरणोत्तर देहदानाची ईच्छा प्रकट केली होती. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे बुधवारी १३ ऑगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता, देवापुरातील, एकविरा मंदिरजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेतील नोकरीवर पाणी सोडून नानांनी पत्रकारीता सुरु केली. सोनादिप पब्लिकेशनची स्थापना करुन कायद्याची ४० हून अधिक व इतर ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिलीत. पुरोगामी विचारांच्या नानांची लेखणी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी, श्रमींकासाठी चालली. सध्या देशातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या