Friday, April 26, 2024
Homeनगरवाहनाच्या धडकेत काळवीट तर विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत काळवीट तर विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-औरंगाबाद महामार्गावर (Nagar-Aurangabad highway) जेऊर (ता. नगर) (Jeur) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू (antelope Death) झाला. तर इमामपूर शिवारात विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू (Deer Death) झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

जेऊर (Jeur) शिवारात लिंगाडे वस्तूजवळ वाहन धडकेत काळविटाचा पाय फ्रॅक्चर झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र ससे यांनी जखमी काळविटावर उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी तुकाराम तवले यांनी जखमी काळविटास नगर येथील वनविभाग कार्यालयात आणले.

तेथे उपचार सुरू असताना या काळविटाचा मृत्यू झाला. तसेच इमामपूर शिवारात बहिरोबा मळ्यातील बहिरू आवारे यांच्या शेतातील विहिरीत पडून हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या