Thursday, April 25, 2024
Homeनगरकोथंबीर, टोमॅटोसह हिरव्या पालेभाज्या महागल्या

कोथंबीर, टोमॅटोसह हिरव्या पालेभाज्या महागल्या

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

ऐन सणासुदीच्या काळात कोथंबीर (Cilantro), टोमॅटोसह (Tomatoes) हिरव्या पालेभाज्या (Leafy vegetables) महाग (Expensive) झाल्याने स्वयंपाक घराचे बजेट कोलमडले आहे. मागील पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले (Excessive Damage to Crops Due to Heavy Rains). त्यात कांदा पिकासह (Onion Crops) हिरव्या पालेभाज्या मिरच्या या पिकांचे मोठे नुकसान (Crops Loss) झाले होते. पाऊस थांबला व त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून मंडईत भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागला असून यामुळे हिरव्या पालेभाज्या महागल्या (Green leafy vegetables are expensive) असून इतरही भाजीपाल्याचे दर गगनाला भिडत आहेत.

- Advertisement -

दिपावली सण तोंडावर आला असताना बाजारात कोथंबीर, मेथी, टोमॅटो त्यांचा तुटवडा जाणवत आहे. सुपा भाजी मंडईमध्ये (Supa Vegitable Market) शेवगा दीडशे रुपये किलोने विकला जात होता. टोमॅटो (Tomato), दोडका वांगे आणि आले 80 रुपये किलोने विकले जात होते. तर मेथी कोथिंबीर 30 रुपयापासून पन्नास रुपयेपर्यंत विकली जात होती. कांदा (Onion), बटाटा (Potatoes) किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपयांनी विकली जात होती. भेंडी 60 ते 70 रुपये काकडी 30 ते 40 रुपये तर हिरवी, मिरची 60 ते 80 रुपये किलोने विकली जात होती. अगोदरच घरगुती गॅस दराने हजाराचा आकडा पार केला असताना, आता भाजीपाला ही महाग (Vegetables are Expensive) झाल्याने स्वयंपाक घराचे बजेट कोलमडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या