Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedवसंत पंचमी निमित्त सरस्वती उपासना गृहात विविध कार्यक्रम

वसंत पंचमी निमित्त सरस्वती उपासना गृहात विविध कार्यक्रम

औरंगाबाद – aurangabad

माता सरस्वतीचा (Saraswati) जन्मदिवस म्हणजेच वसंत पंचमीनिमित्त (Vasant Panchami) सातारा परिसरातील खंडोबा मंदिर मार्गावरील आद्य आद्येश्वरी सरस्वती उपासना गृहात गुरुवार, दि.२६ जानेवारी रोजी दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे हे ७ वे वर्ष आहे.

- Advertisement -

यानिमित्ताने सकाळी १०:३० ते ११:३० दरम्यान चिमुकल्यांवर अक्षर संस्कार करणारे पाटी- पेन्सील पूजन म्हणजेच अक्षरारंभ विधी होईल. दुपारी १२ ते २ दरम्यान उदयोन्मुख कलाकार युगंधरा केचे आणि आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार प्रा.गजानन केचे गायन सादर करतील. दुपारी ४ ते ४:३० दरम्यान देवीची आरती, ४:३०-५:१५ दरम्यान राम निकम यांचे कथाकथन, सायं. ५:१५-६ दरम्यान डॉ.नरेंद्र कुलकर्णी आणि उद्योजक फुलचंद जैन यांचा सत्कार तर सायं. ६-७ दरम्यान शुभम बोराडे आणि सुदर्शन दिलवाले यांचे गायन आणि एस. गणेश यांचे तबला वादन होईल. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाम खांबेकर, गीता खांबेकर, सुमित खांबेकर आणि माधवी शिरोडकर यांनी केले आहे.

असे आहे उपासनागृह

देशातील सरस्वतीचे एकमेव मंदिर असणाऱ्या तेलंगणातील बासर येथील सरस्वती देवीचे शाम खांबेकर हे उपासक आहेत. गेली ४० वर्षे ते नित्यनियमाने बासरला जातात. दूरचे अंतर असल्याने बासरला जाताना भाविकांची अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी सातारा परिसरात उपासना गृह साकारले. येथे राजस्थानच्या मकराना येथून तयार करून आणलेली सरस्वतीची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या