Friday, May 10, 2024
Homeनाशिकसंमेलनाच्या साहित्योत्सवात विविध कार्यक्रम

संमेलनाच्या साहित्योत्सवात विविध कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

साहित्य संमेलनात 94th Marathi Literary Convention मेहता पब्लिशिंग हाऊसने Mehta Publishing House साहित्योत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात लेखक, अनुवादकांना संपादकांशी थेट संवाद साधता येणार आहे. यंदा मेहता मेहता पब्लिशिंग हाऊसने तर्फे शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

- Advertisement -

याबाबत मेेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता म्हणाले, साहित्य संमेलन हे खर्‍या अर्थाने वाचक, लेखक, प्रकाशक व संपादकांसह साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाचा मेळावा असतो. त्यानिमित्ताने प्रत्यक्ष संवाद साधता येतो. ग्रंथप्रदर्शनात खास दालन उघडून संवाद साधण्याची संधी दिली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांंच्या हस्ते होणार आहे.

अक्षय वाटवेे हे द. मा मिरासदार यांच्या कथांंचे वाचन करतील. पावणेबारा वाजता पत्रकार अभिजित कुलकर्णी यांच्या रेडटेप पुस्तकावर स्वानंद बेदरकर मुक्त संवाद साधणार आहेत. सायंकाळी 5 वाजता शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कवितांचे अभिवाचन होणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर यांच्या हस्ते कादंंबरीकार विश्वास पाटील यांच्या ‘आंबा’ या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन होईल.

सायंंकाळी 5 वाजता राजीव तांबे यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन होईल. 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता सुधा मूर्ती लिखित कथांच्या अभिवाचनचा कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी 5 वाजता सहाना विजयकुमार लिखित कशीर अनुवादित कादंबरीचे प्रकाशन होेईल. अनुवादक अपर्णा वेलणकर या उमा कुलकर्णी यांची मुलाखत घेतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या