Saturday, May 4, 2024
Homeनगरवांबोरीत अ‍ॅड. पाटील गटाचा होणार सरपंच

वांबोरीत अ‍ॅड. पाटील गटाचा होणार सरपंच

उंबरे |वार्ताहर|umbare

राजकीय द़ृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणार्‍या जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती (पुरुष) प्रवर्गासाठी निघाले.

- Advertisement -

या प्रवर्गाचा उमेद्वार डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या गटाचा निवडून आलेला आहे. त्यामुळे सरपंचपद आगामी पाच वर्षांसाठी पाटील गटाकडे असणार हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे बहुमत गाठल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर सत्तेच्या पायर्‍या गाठूनही महाविकास आघाडी सरपंचपदाच्या सत्तेपासून दूर राहिली आहे.

काल राहुरी येथे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. वांबोरी गावच्या ग्रामस्थांचे सरपंचपदाच्या या सोडतीकडे लक्ष लागले होते. ही सोडत जाहीर होताच वांबोरी गावामध्ये ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

दि.15 जानेवारी रोजी पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी सर्वाधिक 11 जागा महाविकास आघाडीच्या तर, 6 जागा ग्रामविकास मंडळाच्या आल्या. त्यामुळे तब्बल पंधरा वर्षांनंतर विरोधी महाविकास आघाडीला बहुमत मिळाले. मात्र, सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये 11 जागांपैकी नेमकी एकही जागा महाविकास आघाडीकडे अनुसूचित जाती प्रवर्गाची नाही. त्यामुळे ग्राम विकास मंडळाचे किरण सुधाकर ससाणे सरपंचपदासाठी एकमेव दावेदार सदस्य ठरले आहेत.

ज्येष्ठनेते अ‍ॅड.सुभाष पाटील व डॉ.तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी व समाजाच्या हितासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार असल्याचा विश्वास किरण ससाणे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या