Wednesday, May 8, 2024
Homeनगरवाकडीत मृत कोंबड्याच्या दोन गोण्या आढळल्या

वाकडीत मृत कोंबड्याच्या दोन गोण्या आढळल्या

वाकडी |वार्ताहर| Vakadi

राहाता तालुक्यातील वाकडी येथे श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्यालगत तसेच पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाकडे

- Advertisement -

गोदावरी कालव्यातुन साठवण तलावाकडे जाणार्‍या नलिकेत मृतावस्थेत असलेल्या दोन गोणी भरुन गावरान जातीच्या कोंबड्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दि. 16 रोजी सकाळी काही नागरिकांना खंडोबा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्याकडेला असंख्य कावळे व कुत्रे दिसले. नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्या जयश्री शेळके व राजेंद्र शेळके यांना भ्रमनध्वनीवरुन माहिती कळविली. तिथे दोन गोण्या आढळून आल्या. त्यातुन कुत्रे तसेच कावळे यांनी काही मृतावस्थेतील कोंबड्या दिसल्या. प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मृत पक्षी खड्डे घेऊन पुरण्यात यावे या नियमाला केराची टोपली दाखवत रहदारीच्या ठिकाणी मृत कोंबड्या टाकल्याल्यामुळे नागरिकामध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.

एवढ्या प्रमाणात कोंबड्या एकत्र कशामुळे मृत झाल्या हा प्रकार नेमका काय? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहे. या रस्त्यावरून देवस्थानकडे ये-जा करणारे भाविक, शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांची कायम वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार करणारा व नागरिकांच्या आरोग्याबरोबर खेळ करणारा तो बहाद्दर कोण? या अज्ञात इसमाचा शोध घेऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

या पांढर्‍या रंगाच्या गोण्या एका नामांकित कंपनीच्या कोबंडी खाद्याच्या दिसत आहेत. यातून काही मृत कोंबडीचे पक्षी हे कुत्र्यांनी परिसरात नेले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशाच प्रकारे एक वर्षापूर्वी अशाच पध्दतीने मृतावस्थेत असलेल्या कोंबड्या भरुन गोण्या बेवारस टाकण्याचा प्रकार घडला होता. आता देखिल हाच प्रकार पुन्हा घडला आहे.

या घटनेची माहिती राजेंद्र शेळके यांनी जि. प. सदस्या कविता लहारे तसेच वाकडीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली. हा प्रकार निंदणीय असून नागरिकांच्या आरोग्याबरोबर खेळण्यासारखा आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडु नये यासाठी दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. माहिती मिळताच सरपंच डॉ. संपतराव शेळके यांनी पशुवैद्यकिय अधिकारी श्री. भांड यांना माहिती देवून या मृत पक्षांचा नमुना घेतला असून याबाबत अहवाल आल्यानंतर या कोबंड्याचे मृत्युचे कारण समजणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या