Thursday, April 25, 2024
Homeनगरफलक फाडल्याच्या कारणातून वडनेर हवेलीत दोन गटात हाणामारी

फलक फाडल्याच्या कारणातून वडनेर हवेलीत दोन गटात हाणामारी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील लोणी हवेली गावामध्ये पारनेर नगरपंचायती नगराध्यक्ष विजय औटी यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी 9 प्रमुख संशयितांसह 25 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

यामध्ये दीड तोळे सोने व आयफोनची चोरी झाली असल्याची फिर्याद संभाजी बाबुराव थोरे यांनी दिली आहे.तर दुसरीकडे या दोन गटातील राड्यामुळे लोणी हवेली गावात रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. या दोन गटातील हाणामारी मध्ये निलेश बाळासाहेब कोल्हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पारनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थोरवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगराध्यक्ष विजय औटी यांचे वाढदिवसाचा बॅनर अनिकेत सुभाष शेळके व रोहीत सुनिल शेळके यांनी फाडला होता.

त्याबाबत निलेश कोल्हे याने त्याचा जाब विचारला होता तेव्हा त्यांचेत किरकोळ शाब्दीक बाचाबाची झाली होती. रविवारी रात्री 9 वाजता थोरवे व निलेश ोल्हे, विजय पोपट थोरे, संकेत भरत नवघने असे गप्पा मारीत असताना त्यावेळी तेथे रोहीत सुनिल शेळके, अनिल उत्तम शेळके, मिठु गोलवड, अक्षय शेळके, समिर शेळके, अनिकेत शेळके, अमोल माळी, साईनाथ राक्षे (सर्व रा. लोणी हवेली ता. पारनेर) तसेच अनोळखी 20 ते 25 लोक मोटारसायकलवर आले. त्यांनी थोरवे व त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यांनी गिलवरीने दगड मारले तसेच काठ्यांनी मारहाण केली.तसेच तलवारी, कोयतंनी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे गणेश दुधाडे याचा आयफोन 11 हा कोणीतरी तरी त्याचे पॅन्टचे खिशातुन काढुन घेतला. थोरवे यांच्या गळयातील दिड तोळा वजनाची चैने कोणीतरी हिसकावून घेतली. विजय पोपट थोरे यांचे गळ्यातील सोन्याची चैन अज्ञाताने काढुन घेतली. या तक्रारीनुसार 20 ते 25 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हवालदार शिवाजी कदम करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या