Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये लसीकरणाचा वेग वाढला

औरंगाबादमध्ये लसीकरणाचा वेग वाढला

औरंगाबाद – Aurangabad

शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना (Corona vaccine) कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरूणांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजचे 12 ते 14 हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मागील पाच दिवसांतच सुमारे 70 हजारपेक्षा अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे शहरात लसीकरणाने चार लाखांचा टप्पा ओलांडला. हा प्रतिसाद कायम राहिल्यास व लसींचा पुरवठा झाल्यास आगामी दहा दिवसांत एक लाख नागरिकांचे लसीकरण होईल, असा अंदाज पालिका प्रशासनाने वर्तवला आहे.

- Advertisement -

मोहीम राबविण्यासाठी 115 वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होताच लसीकरणाला आता चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. दररोज 12 ते 14 हजार दरम्यान नागरिकांचे लसीकरण होत आहे. यासोबतच ड्राइव्ह इन, ओळखपत्र नसलेले नागरिक, विदेशात शिक्षणासह नोकरीला जाणारे नागरिक यांचेही लसीकरण केले जात आहे.

पालिकेने मंगळवार दि.22 जूनपासून 69 केंद्रांच्या माध्यमातून 18 वषार्र्ंवरील नागरिकांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन केले. तत्पूर्वी, 20 जूनपर्यंत शहरात 3 लाख 39 हजार 827 जणांचे लसीकरण झाले होते. त्यात 18 ते 44 वयोगटातील 27 हजार 301 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला होता. 3 लाख 93 हजार 153 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यात 18 ते 44 वयोगटातील तरूणांची संख्या 76 हजार 765 एवढी आहे. दरम्यान, दिवसभरात 17,007 नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे शहराने चार लाखांच्या लसीकरणाचा टप्पा पार केला. 21 ते 25 या मागील पाच दिवसांतच सुमारे 70 हजार जणांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. सध्या प्रत्येक केंद्रावर किमान 200 जणांचे लसीकरण नियमित केले जात आहे. विशेष म्हणजे, कोविन अ‍ॅप नोंदणीतील अडचणी लक्षात घेता पालिकेने नोंदणी न करताच थेट लस घेण्यासाठी केंद्रावर या, असे आवाहन केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

शहरातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण जलदगतीने करण्याच्या दृष्टीने पालिकेकडून सोसायटींमध्येही लसीकरण करण्याची अभिनव राबवण्याचा निर्णय घेता आहे. यासाठी लसीकरणाची मोबाइल टीम तयार केली आहे. सोसायटींतील दोनशे लाभार्थ्यांची यादी सादर केल्यास अशा सोसायटींच्या ठिकाणी पालिकेकडून लसीकरण कॅम्प (Vaccination Camp) घेतला जाणार आहे.

आजवरचा लसीकरणाचा आलेख

एक लाखाचा टप्पा : 1 एप्रिल

दोन लाखांचा टप्पा : 24 एप्रिल

तीन लाखांचा टप्पा : 29 मे

चार लाखांचा टप्पा : 25 जून

- Advertisment -

ताज्या बातम्या