Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशयूपीएससी उमेदवारांना परीक्षाकेंद्र बदलण्यास परवानगी

यूपीएससी उमेदवारांना परीक्षाकेंद्र बदलण्यास परवानगी

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) देशभरातील उमेदवारांना येत्या 4 ऑक्टोबरला होणार्‍या प्राथमिक परीक्षेसाठी आपले केंद्र बदलण्यास परवानगी दिली आहे. यात भारतीय वनसेवा परीक्षा 2020 चाही समावेश आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून आयोगाने त्यांना आपले परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली असल्याचे आयोगाने बुधवारी एका निवेदनानुसार जाहीर केले. हाच पर्याय सनदी सेवा परीक्षा (मुख्य), 2020 आणि भारतीय वन परीक्षा (मुख्य), 2020 साठीही उपलब्ध असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र बदल करण्याबाबत दोन टप्पे तयार करण्यात आले आहेत. 7 ते 13 जुलै 2020 या पहिल्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजता, तर दुसर्‍या टप्प्यात 20 ते 24 जुलै 2020 या दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी सहा वाजता आयोगाचे संकेतस्थळ र्ीिीलेपश्रळपश.पळल.ळप. वर केंद्राची नोंद करता येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर (वेबसाईट) आपण निवडलेल्या केंद्राची नोंद करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या