Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपंजाब बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

पंजाब बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

मालेगाव | Nashik
24 तास वर्दळ असलेल्या सटाणानाका भागातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली.

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला मात्र कुणी आल्याची चाहूल लागल्याने त्याने पळ काढल्यामुळे तो अयशस्वी ठरला. एटीएममध्ये सुमारे दहा लाखाची रोकड आहे. रक्कम आहे की चोरीस गेली याचा उलगडा उशीरापर्यंत होवू शकला नव्हता.

- Advertisement -

सटाणानाका भागात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम आहे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील केंद्राचे शटर उचकावून एटीएम केंद्रात प्रवेश केला.

यावेळी आपला चेहरा दिसू नये यासाठी चोरट्याने चलाखीने सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यांवर स्प्रे देखील मारले. मात्र एटीएममध्ये असलेल्या एका कॅमेर्‍यात चोरट्याचा चेहरा व हालचाली कैद झाल्या आहेत. कॅमेर्‍यावर स्प्रे मारल्यानंतर चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने रक्कम ठेवली जात असलेला भाग फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या अधिकार्‍यांसह पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, पो.नि. प्रविण वाडिले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानेच चोरट्याने पळ काढला असावा, असा कयास पोलिसांतर्फे व्यक्त केला गेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या