Friday, April 26, 2024
Homeनाशिकऑडिटर असल्याचे भासवून सव्वा लाखाची रोकड लंपास

ऑडिटर असल्याचे भासवून सव्वा लाखाची रोकड लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

ऑडिटर असल्याचे भासवून पैसे (Money) मोजण्याच्या बहाण्याने सुमारे सव्वा लाखाची रोकड लंपास (Cash Piles) केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या विजयममता सिनेमा गृहाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये घडली आहे…

- Advertisement -

Nashik Accident News : इको कार पुलावरुन थेट नदीत कोसळली; लहान बालिकेसह तिघांचा मृत्यू

याबाबत सौरभ सतीश शेटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, आपले नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या विजय ममता सिनेमागृहाजवळ मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट असून रेस्टॉरंटमध्ये एक अनोळखी इसम आला व ऑडिटर असल्याचे सांगून पैसे मोजण्याच्या बहाण्याने काउंटरमधील सुमारे एक लाख २६ हजार ९३२ रुपयाची रोख रक्कम हातोहात लंपास केली असे तक्रारीत म्हटले आहे .

Bus Accident : बस दरीत कोसळून भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध (Unknown Thief) गुन्हा दाखल (Filed a case) केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या