Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या१ जुलैच्या मोर्चासाठी शिवसैनिकांची एकजूट करा

१ जुलैच्या मोर्चासाठी शिवसैनिकांची एकजूट करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

प्रशासकीय राजवटीत मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या १ जुलै रोजी निघणाऱ्या पक्षाच्या विराट मोर्चात शिवसैनिकांची एकजूट दाखवा, अशी सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विभाग प्रमुखांना केली.

- Advertisement -

मुंबई महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या माेर्चाची ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. या तयारीचा भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी आज विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत मोर्चाचे योग्य नियोजन करण्याची सूचना देण्यात आली. १ जुलैला मेट्रो सिनेमा येथून दुपारी ३ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असून उद्धव ठाकरे या मोर्चाला संबोधित करणार आहेत.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर ठाकरे गट आणखी सक्रिय झाला आहे. मुंबई महापालिकेवरील मोर्चाबाबत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर काल विभागप्रमुखांची बैठक घेत तयारीचे आदेश दिले.

सुरुवातीला भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानातून मोर्चा काढण्याचे नियोजन हाेते. परंतु, सध्या या ठिकाणाहून मोर्चा काढण्यास मनाई असल्याने हा मोर्चा मेट्रो सिनेमा येथून काढण्यात येणार आहे. हा मोर्चा १ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मार्गक्रमण करेल. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करतील. महापालिकेजवळ आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन उद्धव ठाकरे या मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी बैठकीनंतर दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या