गणवेषाचे 10 कोटी शाळा व्यवस्थापन समितीकडे होणार वर्ग

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmednagar – जिल्ह्यात यंदा करोनाच्या पार्श्वाूमीवर प्राथमिक शाळा सुरू होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेष देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केले आहे. जिल्ह्यात बहुतांशी भागात पाठ्यपुरस्तकांचे वितरण झाले असून आता जिल्ह्यातील 1 लाख 66 हजार 871 विद्यार्थ्यांना गणवेष देण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 10 कोटी 1 लाख 22 हजार रुपये मंजूर झाले असून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरवर्षी केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेष योजना राबविण्यात येते. पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, तसेच जमाती मुले व दारिद्य्ररेषेखालील पालकांची मुले यांना गणवेषाचा लाभ देण्यात येतो. यात गणवेषाच्या एका जोडसाठी 300 रुपयांप्रमाणे तर दोन गणवेषासाठी 600 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामागे निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे शिक्षण विभागाकडून वर्ग केला जातो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती या पैशातून विद्यार्थ्यांसाठी गणवेष खरेदी करत असते.

करोना संसर्गामुळे लॉकडाऊन आणि शाळा सुरू झाल्या नसल्या तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप केलेली आहे. मात्र गणवेषाची रक्कम वर्ग झालेली नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी शासनाने 10 कोटी रुपयांची ही रक्कम मंजूर केली आहे. शिक्षण विभाग त्याचे नियोजन करून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करणार आहे, अशी माहिती प्राथमिक विाागाचे शिक्षणाधिाकरी रमाकांत काठमोरे यांनी दिली.

मुली 1 लाख 15 हजार 86, अनुसूचित जाती मुले 17 हजार 343, अनुसूचित जमाती मुले 19 हजार 192 आणि दारिद्यरेषेखालील मुले 15 हजार 250 एकूण 1 लाख 66 हजार 871 असे आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *