Thursday, April 25, 2024
Homeजळगावशाळेची भिंत पडून 13 वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू

शाळेची भिंत पडून 13 वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

नशिराबाद गावात शाळेचे संरक्षण भिंत पडून 13 वर्षीय मुलाचा दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. 31 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनूसार मयत मोहित योगेश नारखेडे (वय-13 रा., अळी नशिराबाद ता, जळगाव) हा आईवडील व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने शुक्रवारी 31 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेळत होता. खेळताखेळता अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर पडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान त्याचा प्राणज्योत मालविली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहे.

आई-वडीलांचा आक्रोश

भित अंगावर पडून जखमी झालेला 13 वर्षीय मुलावर उपचार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुपारी 12 वाजता मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आई वडीलांचा आक्रोश मनहेलावणारा होता. मयताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई असा परिवार आहे. तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत.

गुन्हे दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदार याच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या